'शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती..' बच्चू कडूंची मोठी घोषणा; प्रहार संघटनेचं काय होणार?

बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

Bachhu Kadu Enters in Shivsena

Bachhu Kadu Enters in Shivsena

मुंबई तक

30 Apr 2026 (अपडेटेड: 30 Apr 2026, 11:38 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती..'

point

बच्चू कडूंची मोठी घोषणा

point

प्रहार संघटनेचं काय होणार?

Bachhu Kadu Enters in Shivsena, दीपेश त्रिपाठी : विधानपरिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. काल ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली. यानंतर काँग्रेसही विधान परिषद लढवणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केली. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा रंगली आहे. यातच आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्याविषयी महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

हे वाचलं का?

विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. आज (30 एप्रिल) सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

का केला प्रवेश?

बच्चू कडू म्हणाले की, काल, परवा झालेल्या चर्चेमध्ये आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. बच्चू कडूचं काम प्रामाणिकपणे राहील. शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्याचं काम प्रामाणिकपणे करु. पण त्या बदल्यात आम्हाला शेतकऱ्यांची, दिव्यांगांची ताकद हवी आहे. त्यामध्ये कोणताही समझोता होणार नाही. दिव्यांग मंत्रालयाच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या  लढाईत इंचभरही फरक पडणार नाही.

हे ही वाचा : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरला, 'या' माजी मंत्र्याच्या मुलाला संधी

प्रहार संघटनेचं काय होणार?

प्रहार संघटनेचं काय होणार याविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार. मात्र पूर्ण ताकदीने शिवसेना कशी वाढेल, या अंगातला प्रत्येक रक्ताचा थेंब जितका पक्षासाठी धावणार, तितकाच शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी धावणार आहे. 

हे ही वाचा : मुंबई : कुर्ल्यात गँगवार, आधी गोळ्या घातल्या अन् नंतर धारदार शस्त्रांनी वार; बाबा पवारला भररस्त्यात संपवले

24 तासात काय घडलं?

काल बोलताना बच्चू कडूंनी वेगळी भूमिका मांडली होती. मात्र पुढील 24 तासात काय झालं असं विचारलं असता ते म्हणाले की, 24 तासात हमीभावावर चर्चा झाली, पेरणी ते कापणी पर्यंतच्या विषयावर चर्चा झाली, आदिवासींसंदर्भात चर्चा झाली, दिव्यांगांसंदर्भात चर्चा झाली. आणि त्यांनी (एकनाथ शिंदेंनी) सगळ्याला सहमती दर्शवली.