Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी झटणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट रोजी आज गणपत्ती बाप्पाची आरती केली. त्यानंतर आता ते मुंबईकडे आगेकूच करणार आहेत. काही दिवसांपूर्वी आम्ही मुंबईतून गणेश विसर्जन करूनच पुन्हा परतू असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर ते अंतरवाली सराटीतून मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना होत आहेत. अंतरवाली सराटीत त्यांनी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठा केली आहे. तसेच मूर्तीच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोस्टर आणि पुतळा दिसून येतोय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बाप्पाच्या आगमनादिवशीच वरुणराजाची दमदार हजेरी, राज्यात पावसासह भक्तीचं वातावरण, जाणून घ्या हवामान
मुंबईकडे आगेकूच
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाच्या मागण्यांची अंमजलबजावणी करण्यासाठी कालपर्यंतचा म्हणजेच 26 ऑगस्ट 2025 पर्यंतचा वेळ दिला होता, पण सरकारने त्यावर कसलीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांसह मोर्चा घेऊन मुंबईतील आझाद मैदानाकडे कूच करतील.
या मार्गे करतील कूच
ते आपल्या मराठा बांधवांसह शहागड, पैठण, शेवगाव,पांढरीपूल, अहिल्यानगर, नेप्टी नाका मार्गे आळेफाटा, शिवनेरी दर्शन, माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर,मंत्रालय अशा मार्गाने मुंबईला येणार आहे. तर पैठण, गंगापूर, वैजापूर, येवला, नाशिक, मुंबई अशा पर्यायी मार्गनेही ते मुंबईकडे कूच करू शकतात.
हे ही वाचा : गणेश चतुर्थी 2025: “गणपती बाप्पा मोरया” असा जयघोष का केला जातो? ‘मोरया’ शब्दामागचा इतिहास माहितीये?
आझाद मैदानावरील परवानगी नाकारणे फडणवीसांचा खेळ
याचपार्श्वभूमीवर आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी न्यायालयाने मनोज जरांगेना परवानगी दिली नाही. यानंतर आता मनोज जरांगेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, आझाद मैदानावरील परवानगी नाकारणं हा देवेंद्र फडणवीसांचा खेळ असल्याचा जरांगेनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
ADVERTISEMENT
