महाराष्ट्रातील खासदार दुबईत अडकला, कुटुंबियांशी संपर्क झाला का? नेमकं काय घडलं?

मुंबई तक

02 Mar 2026 (अपडेटेड: 02 Mar 2026, 01:29 PM)

Maharashtra Politics : डॉ. कल्याण काळे हे दोन दिवसांपूर्वी दिल्लीहून खाजगी कामासाठी आणि पर्यटनासाठी आपल्या 4 ते 5 मित्रांसह दुबईला गेले होते. मात्र, दरम्यानच्या काळात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. यामुळे डॉ. काळे यांना भारतात परतणे शक्य झाले नाही.

Maharashtra Politics

Maharashtra Politics

Google CTA

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील खासदार दुबईत अडकला

point

कुटुंबियांशी संपर्क झाला का? नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics, जालना : मध्यपूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या तणावाचा फटका जालन्याचे काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे यांना बसला असून, विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे ते सध्या दुबईमध्ये अडकले आहेत. मात्र, ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे.

हे वाचलं का?

कल्याण काळे कोणत्या कामासाठी गेले होते दुबईला? 

डॉ. कल्याण काळे हे दोन दिवसांपूर्वी दिल्लीहून खाजगी कामासाठी आणि पर्यटनासाठी आपल्या 4 ते 5 मित्रांसह दुबईला गेले होते. मात्र, दरम्यानच्या काळात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. यामुळे डॉ. काळे यांना भारतात परतणे शक्य झाले नाही.

हेही वाचा : 'मी तुझं नाव लिहून जात नाहीये..' बायकोच्या अनैतिक संबंधांना वैतागून तरुणाची आत्महत्या; बायकोला केला शेवटचा मेसेज

कुटुंबीयांनी दिली माहिती

या घटनेबाबत माहिती देताना खासदार डॉ. कल्याण काळे यांचे बंधू भाऊसाहेब काळे यांनी सांगितले की, "खासदार महोदय दुबईतील एका हॉटेलमध्ये सुखरूप आहेत. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. विमानसेवा पुन्हा सुरू होताच ते भारतात परततील. आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत."

युद्धाचे सावट आणि विमानसेवा ठप्प

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने इराणची राजधानी तेहरानसह काही महत्त्वाच्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यानंतर इराणकडूनही प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE), कुवैत, कतार आणि बहरीन यांसारख्या देशांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली असून, हवाई मार्ग असुरक्षित असल्याने अनेक विमानांचे मार्ग वळवण्यात आले आहेत किंवा उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. डॉ. कल्याण काळे सध्या दुबईत परिस्थिती पूर्वपदावर येण्याची प्रतीक्षा करत आहेत. प्रशासन आणि त्यांचे निकटवर्तीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

लग्न झाल्यानंतरही एक्स बॉयफ्रेंड त्रास द्यायचा, शेवटी तरुणीने घरी बोलवून केला खून, ओळख पटू नये म्हणून ॲसिड फेकलं