Iran Supreme Leader Khameini Death : मध्य-पूर्वेतील युद्धाने अत्यंत भीषण वळण घेतले असून इस्त्राईल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. खामेनी यांच्या निधनानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेत अमेरिकेच्या 14 लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यात शेकडो अमेरिकन सैन्य मारले गेल्याचा दावा इराणने केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : घरात घुसून वहिनीवर चाकूने वार केले अन् काही तासांतच झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिराचा मृतदेह... नेमकं काय घडलं?
खामेनींच्या कुटुंबियांचा शेवट
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात केवळ खामेनीच नव्हे, तर इराणमधील 40 हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवडून टार्गेट करण्यात आले आहे. यामध्ये खामेनी यांच्या कुटुंबातील त्यांची मुलगी, नात, जावई मोहतबा खामेनी आणि सून जहरा हद्दाद अदेल यांचाही मृत्यू झाला आहे.
हल्ल्यात मारले गेलेले इराणी अधिकारी
मोहम्मद पकपूर : या हल्ल्यात खामेनी यांचे विश्वासू आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर मोहम्मद पकपूर हे ठार झाले आहेत. कट्टरपंथीय असलेले पकपूर यांना खामेनी यांनीच पुढे आणले होते.
अमीर नासिरजादेह : इराणचे संरक्षण मंत्री आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे मास्टरमाईंड मानले जाणारे अमीर नासिरजादेह हे देखील या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत. इस्त्राईलच्या डिफेन्स फोर्सने केलेल्या हल्ल्यात ते ठार झाले.
अली शमखानी : खामेनेई यांचे सर्वात विश्वासू सल्लागार, सुरक्षा परिषदेचे प्रमुख आणि अण्वस्त्र वाटाघाटीत महत्त्वाची भूमिका बजावणारे शमखानी आपल्या कुटुंबासह मृत्यूमुखी पडले.
इस्माईल कानी : कुड्स फोर्सचे प्रमुख आणि हिजबुल्ला-हुती सारख्या गटांचे सूत्रधार कानी यांचाही ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
मोहम्मद बघेरी : सशस्त्र दलाचे चीफ ऑफ स्टाफ आणि धोरणात्मक नियोजनाचे प्रमुख बघेरी हे देखील या हल्ल्याचे बळी ठरले आहेत.
हे ही वाचा : प्रेयसीनं अबोला धरला, प्रियकर स्कूटीवरुन 370 किमीचा प्रवास करुन पोहोचला अन् घडलं भयंकर
इराणचा जोरदार पलटवार
आपले सर्वोच्च नेते आणि लष्करी नेतृत्व गमावल्यानंतर इराणने प्रतिहल्ला चढवला आहे. इराणच्या स्टेट मीडियानुसार, दुबईतील सीआयए फॅसिलिटीवर क्षेपणास्त्र डागून ती उद्ध्वस्त करण्यात आली आहे. इराणने दावा केला आहे की, त्यांनी अमेरिकेच्या ज्या 14 लष्करी तळांना लक्ष्य केले, तिथे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला असून, इराण आणि इस्त्राईल-अमेरिका यांच्यातील हे थेट युद्ध आता कोणत्या दिशेला जाणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT











