राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद राखण्यासाठी काँग्रेसची उद्धव ठाकरेंना 'फोनाफोनी', नवी ऑफरही देऊन टाकली

Maharashtra Politics : काँग्रेस प्रभारी Ramesh Chennithala यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडावी, अशी विनंती करत त्याबदल्यात विधान परिषदेतील रिक्त होणारी जागा उद्धव ठाकरेंना देण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून मांडण्यात आला आहे.

Maharashtra Politics

Maharashtra Politics

मुंबई तक

02 Mar 2026 (अपडेटेड: 02 Mar 2026, 10:13 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद राखण्यासाठी काँग्रेसची उद्धव ठाकरेंना 'फोनाफोनी'

point

नवी ऑफरही देऊन टाकली

Maharashtra Politics : राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवर दावा ठोकल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. राष्ट्रीय पातळीवर आपले संख्याबळ अबाधित ठेवण्यासाठी ही जागा काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रभारी Ramesh Chennithala यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडावी, अशी विनंती करत त्याबदल्यात विधान परिषदेतील रिक्त होणारी जागा उद्धव ठाकरेंना देण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून मांडण्यात आला आहे.

हे वाचलं का?

काँग्रेसच्या मते, या तडजोडीमुळे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी मजबूत राहील, तर राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची एकजूट टिकवण्यास मदत होईल. मात्र या प्रस्तावावर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते Sharad Pawar काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : धाराशिव : काकाने पुतणीला गळा दाबून संपवलं, कोयत्याने तुकडे करुन मृतदेह चारीमध्ये पुरला, हत्येचं कारणही समोर

राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचं गणित नेमकं काय? 

या सगळ्यामागे स्पष्ट राजकीय गणित आहे. राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या 245 असून, विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे किमान 10 टक्के म्हणजेच 25 सदस्य असणे आवश्यक आहे. सध्या काँग्रेसकडे 27 सदस्य आहेत. मात्र यावर्षी होणाऱ्या 72 जागांच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या निवडणुकांनंतर हे संख्याबळ 25 च्या खाली जाण्याची भीती काँग्रेसला आहे. 16 मार्च रोजी 37 जागांसाठी, 24 जून रोजी 24 जागांसाठी आणि 11 नोव्हेंबर रोजी 11 जागांसाठी निवडणुका होणार आहेत.

पहिल्या टप्प्यातील 37 जागांपैकी काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी, रजनी पाटील, फुलोदेवी नेताम आणि केटीएस तुलसी यांचा कार्यकाळ संपत आहे. याशिवाय जून महिन्यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते Mallikarjun Kharge यांचाही कार्यकाळ संपणार आहे. जर काँग्रेसने आपल्या विद्यमान जागा राखल्या नाहीत, तर ‘विरोधी पक्षनेते’ हे महत्त्वाचे पद गमावण्याची वेळ येऊ शकते. विशेषतः महाराष्ट्रातून रजनी पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्याने ती जागा पुन्हा जिंकणे काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यावश्यक मुद्दा बनला आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तुलनेने सुरक्षित मानली जाणारी जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे चित्र आहे. आता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काय भूमिका घेतात आणि या राजकीय गणिताचा शेवट कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 


मुलाच्या डोक्यात हातोड्याने ठोकला अडीच इंचाचा लोखंडी खिळा, वडील अन् भावाचं कृत्य; मुलाचं काय झालं?