Mood Of The Nation Survey : देशाचा मूड नेमका कसा आहे, याबाबत इंडिया टुडेनं सी-वोटरसोबत 'मूड ऑफ द नेशन' सर्व्हे केला आहे. सर्व्हेचं सॅम्पल साईज 2,06,826 इतकं होतं. 1 जुलै 2025 ते 14 ऑगस्ट 2025 पर्यंत हा सर्व्हे करण्यात आला. पीएम नरेंद्र मोदी यांच्या नंतर पंतप्रधानपदाचा दावेदार कोण? असा प्रश्न या सर्व्हेच्या माध्यमातून जनतेला विचारण्यात आला. यावर जनतेचं त्यांचं मत मांडलं असून कोणत्या नेत्याच्या बाजूनं किती कौल आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
भाजपमध्ये पंतप्रधानपदाचा दावेदार कोण?
पीएम मोदींनंतर भाजपमध्ये पंतप्रधानपदाचा दावेदार म्हणून तीन नेत्यांची नाव निश्चित केली होती. सर्व्हेमध्ये अशी माहिती समोर आली की, 28 टक्के लोकांनी अमित शाहा यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे जनतेच्या सपोर्टमुळे ते या शर्यतीत पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे.
तर दुसरा पर्याय म्हणून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. 26 टक्के लोकांनी त्यांना पुढचा पंतप्रधानपदाचा दावेदार म्हणून निवडलं आहे. तर तिसरा पर्याय म्हणून नितीन गडकरी यांना सर्वात कमी समर्थन मिळाल्याचं समोर आलंय. त्यांना फक्त 7 टक्के लोकांचं समर्थन मिळालं आहे.
हे ही वाचा >> गणेश चतुर्थी 2025: मुंबईतील बाप्पाच्या दर्शनासाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय! मध्य रेल्वेवर 'इतक्या' स्पेशल ट्रेन धावणार
पुढील पंतप्रधानपदाचा दावेदार कोण?
पंतप्रधानपदासाठी सर्वात प्रबळ दावेदार कोणता नेता असू शकतो? असा प्रश्न MOTN सर्व्हेमध्ये विचारण्यात आला. यावर 52 टक्के लोकांनी म्हटलंय की, नरेंद्र मोदी अजूनही पंतप्रधानपदासाठी सक्षम आहेत.
विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींचंं कामकाज कसं राहिलं?
सर्व्हेमध्ये हा प्रश्न विचारल्यानंतर 28 टक्के लोकांनी म्हटलंय, त्यांचं काम खूप चांगलं आहे. तर 22 टक्के लोकांनी म्हटलंय, त्यांचं काम चांगलं आहे. 16 टक्के लोकांच्या मनात त्यांचं काम सरासरी असल्याचं समोर आलंय. तर 15 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, त्यांचं कामकाज चांगलं नाहीय. 12 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेता म्हणून खूप वाईट काम केलं आहे.
सर्व्हेचं सॅम्पल साईज
इंडिया टूडे सी व्होटर मूड ऑफ द नेशन सर्व्हेमध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये आणि लोकसभा विभागात 1जुलै ते 14 ऑगस्ट 2025 दरम्यान 54 हजार 788 लोकांचं मत जाणलं आहे. याशिवाय मागील 24 आठवड्यांमध्ये 1 लाख 52 हजार 38 लोकांनी जे मतं व्यक्त केलं आहे, तेही या सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. याप्रकारे एकूण 2 लाख 6 हजार 826 लोकांचं मतप्रदर्शन या सर्व्हेच्या माध्यमातून समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
