महाराष्ट्रातून विनोद तावडेंसह चौघांच्या नावाची घोषणा, राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर

मुंबई तक

04 Mar 2026 (अपडेटेड: 04 Mar 2026, 12:40 PM)

Rajyasbha election 2026 : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये चार जणांचा समावेश आहे.

Rajyasbha election 2026

Rajyasbha election 2026

Google CTA

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातून विनोद तावडेंसह चौघांच्या नावाची घोषणा

point

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Rajyasbha election 2026 : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये एकूण चार जणांचा समावेश आहे. दरम्यान, काल (3 मार्च) रोजी भाजपने महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

हे वाचलं का?

हे ही वाचा : अजितदादांच्या अपघाताआधी विमानतळाची रेकी, रोहित पवार यांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्रातून 'या' चार जणांना संधी

1. रामदास आठवले
2. विनोद तावडे
3. माया चिंतामण ईवनाते
4. रामराव वडकुते

राज्यसभेसाठी इतर राज्यातील भाजपचे उमेदवार

बिहार : नितीन नवीन, शिवेश कुमार

आसाम : तेराश गोवाला, जोगेन मोहन

छत्तीसगड : लक्ष्मी वर्मा

हरियाणा : संजय भाटिया

ओरिसा : मनमोहन सामल, सुजीत कुमार

पश्चिम बंगाल : राहुल सिन्हा

हे ही वाचा : MS Dhoni ला मोठा दणका, बेदरकारपणे गाडी चालवण्याप्रकरणी दंडात्मक कारवाई, गृहनिर्माण मंडळाकडूनही नोटीस

कधी होणार राज्यसभेची निवडणूक?

एप्रिलमध्ये राज्यसभेतील 37 सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ही निवडणूक प्रक्रिया 20 मार्चपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानुसार ही निवडणूक 16 मार्च रोजी होणार आहे. यादिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राज्यसभेसाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत 5 मार्च पर्यंत आहे. तर अर्ज माघारी घेण्याची मुदत 9 मार्च आहे.