Rohit Pawar : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताआधी विमानतळाची रेकी करण्यासाठी काही लोक आले असल्याचा खळबळजनक दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) ने अजित पवार यांच्या अपघाताचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्या रिपोर्टवरील आक्षेप नोंदवण्यासाठी रोहित पवार यांनी आज (4 मार्च) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये प्रेझेंटेशन केले. त्यावेळी त्यांनी हा खळबळजनक दावा केला. ते म्हणाले की, 'काही लोकांचं असं मत आहे की अपघातापूर्वी विमानतळाची रेकी करण्यासाठी काहीजण आले होते. सीआयडी आणि सीबीआयने याचे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करावे असं आमचं मत आहे.' या प्रेझेंटेशनदरम्यान रोहित पवार नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बाबा सिद्दीकींच्या हत्याप्रकरणात 'बिल्डर लॉबी'चा संबंध नाही, मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केलं प्रतिज्ञापत्र
'आपण उपस्थित केलेल्या शंका खऱ्या'
अजित पवार यांच्या अपघाताचा 22 पानी रिपोर्ट एएआयबीने 28 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केला. या रिपोर्टवर रोहित पवार यांनी ताशेरे ओढले होते. त्यानंतर याविषयी सविस्तर आक्षेप नोंदवण्यासाठी त्यांनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये प्रेझेंटेशन दिले. यावेळी ते म्हणाले की, 'मी VSR किव्हा DGCA च्या विरोधात नाही. प्रत्येक गोष्टीच्या खोलात गेल्याशिवाय खर काय ते आपल्याला कळणार नाही. मात्र या कंपनीला कोणीतरी वाचवत आहे. आपण ज्या शंका उपस्थित केल्या होत्या त्या शंका चौकशीच्या अहवालात खऱ्या ठरल्या आहेत.'
'बारामतीला जिल्हा करुन टाकले आहे'
या प्रेझेंटेशन दरम्यान रोहित पवार यांनी रिपोर्टवर ताशेरे ओढले. या रिपोर्टमध्ये बारामतीचा जिल्हा असा उल्लेख करण्यात आला आहे. ते म्हणाले की, 'डोळ्यात तेल घालून इन्व्हेस्टिगेशन करण्याची गरज असते. आमची अपेक्षा होती की अहवालात कोणतीही चूक होऊ नये. या रिपोर्टमध्ये बारामतीला जिल्हा करून टाकलं आहे. यावरुन आपण अंदाज बांधू शकतो की AAIB या रिपोर्टसाठी किती सीरियस आहे?' यापुढे बोलताना ते म्हणाले की, 'रिपोर्टमध्ये सांगितलय की विमान झाडांना धडकून खाली पडले. पण आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी झाडंच नाहीत. फक्त छोटंसं झुडूप आहे, ज्याला विमान टच सुद्धा झाले नाही.' विमान झाडांना धडकलल्याचा उल्लेख चुकीचा असल्याचं पवार म्हणाले.
हे ही वाचा : रंग खेळून नदीवर गेला अन् परतलाच नाही, वैनगंगेत बुडून इंजिनिअरचा मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडंच मिळेनात
'ब्लॅक बॉक्सचा फोटो रिपोर्टमध्ये नाही'
ब्लॅक बॉक्सचा फोटो रिपोर्टमध्ये नसल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले की, आमच्याकडे ब्लॅक बॉक्सचे फोटो आले आहेत. त्यात ब्लॅक बॉक्सला जास्त नुकसान झाल्याचं दिसत नाही. तसेच अपघाती विमानाचा CVR 2021 सालचा होता. Honeywell कंपनीचं हे मॉडेल आहे. हे नवीन मॉडेल जळणं शक्यच नाही.' यापुढं बोलताना ते म्हणाले की, 'फ्लाईट रडारची माहितीदेखील पब्लिक डोमेनमधून डिलिट करण्यात आली आहे.'
ADVERTISEMENT











