BJP Candidates for Rajyasabha 2026 : भाजपने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केलेल्या या यादीत विविध राज्यांतील रिक्त जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.
ADVERTISEMENT
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रभारी म्हणून काम पाहिलेल्या आणि बिहारमध्ये भाजपला बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नितीन नवीन यांना बिहारमधून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, या यादीत कोणाकोणाचा समावेश करण्यात आलेला आहे जाणून घेऊया.
हे ही वाचा : 'त्या' 2 रिल्स बाहेर येऊ द्यायच्या नसतील तर नरेंद्र मोदी यांनी खुर्ची खाली करावी, प्रकाश आंबेडकरांच्या ट्वीटने खळबळ
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी पुढीलप्रमाणे
बिहार : नितीन नवीन, शिवेश कुमार
आसाम : तेराश गोवाला, जोगेन मोहन
छत्तीसगड : लक्ष्मी वर्मा
हरियाणा : संजय भाटिया
ओरिसा : मनमोहन सामल, सुजीत कुमार
पश्चिम बंगाल : राहुल सिन्हा
कधी होणार निवडणूक?
एप्रिल 2026 मध्ये राज्यसभेतील 37 जागा रिक्त होणार आहेत. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 मार्च 2026 असणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 9 मार्च आहे. मतदान 16 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 20 मार्च 2026 पूर्वी पूर्ण केली जाणार आहे.
हे ही वाचा : फडणवीस साहेब, लंडनला निघालेला माझा मुलगा कुवैतमध्ये अडकलाय, विशाखा सुभेदार यांनी हंबरडा फोडला, मदतीसाठी याचना
महाराष्ट्रातील सात खासदार होणार निवृत्त
महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले सात खासदार एप्रिल 2026 मध्ये निवृत्त होणार आहेत. यामध्ये शरद पवार, रामदास आठवले, फौजिया खान (राष्ट्रवादी शरद पवार), रजनी पाटील, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील (भाजप) आणि भागवत कराड यांचा समावेश आहे. यामुळे आता महाराष्ट्रातून राज्यसभेवर कोण जाणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
ADVERTISEMENT











