अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला, इराणचे जोरदार प्रत्युत्तर; सौदी अरेबियातील अमेरिकेन दूतावासदेखील जळाले

मुंबई तक

03 Mar 2026 (अपडेटेड: 03 Mar 2026, 11:17 AM)

Iran Attacks Dubai : इराणने संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) दुबई येथे असलेल्या अमेरिकन लष्करी तळावर मोठा ड्रोन हल्ला केल्याने मध्यपूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने आपल्या 'शाहेद-136' या घातक ड्रोनचा वापर करून दुबईतील एका इमारतीला लक्ष्य केले, जिथे अमेरिकन लष्करी अधिकारी उपस्थित होते.

Iran Attacks Dubai

Iran Attacks Dubai

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला

point

इराणचे जोरदार प्रत्युत्तर

point

सौदी अरेबियातील अमेरिकेन दूतावासदेखील जळाले

Iran Attacks Dubai : इराणने संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) दुबई येथे असलेल्या अमेरिकन लष्करी तळावर मोठा ड्रोन हल्ला केल्याने मध्यपूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने आपल्या 'शाहेद-136' या घातक ड्रोनचा वापर करून दुबईतील एका इमारतीला लक्ष्य केले, जिथे अमेरिकन लष्करी अधिकारी उपस्थित होते. या हल्ल्यापूर्वी सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावासावरही इराणने ड्रोनद्वारे हल्ला केला होता, ज्यामध्ये इमारतीला आग लागल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, सुदैवाने दूतावासावर हल्ला झाला तेव्हा ती इमारत रिकामी होती, असे प्राथमिक अहवालात म्हटले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Dhananjay munde : धनंजय मुंडेंना क्लीन चीट, अंजली दमानियांचे आरोप लोकायुक्तांनी फेटाळले!

कतारच्या संरक्षण मंत्रालाचे अधिकृत निवेदन

कतारच्या संरक्षण मंत्रालयाने या घडामोडींवर अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले असून, इराणकडून डागण्यात आलेली बहुतांश क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. कतारच्या संरक्षण यंत्रणेने तीन क्रूझ क्षेपणास्त्रे,101 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपैकी 98 क्षेपणास्त्रे, 39 पैकी 24 ड्रोन आणि दोन्ही 'SU-24' लढाऊ विमाने रोखण्यात यश मिळवले आहे. हा हल्ला अत्यंत नियोजित होता, परंतु मित्र राष्ट्रांच्या संरक्षण यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.

 

सौदीने इराणचे आठ ड्रोन नष्ट केले

दुसरीकडे, सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयानेही या युद्धासदृश परिस्थितीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संरक्षण मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते मेजर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी सांगितले की, रियाध आणि अल-खार्ज शहरांच्या जवळ येत असलेले इराणचे 8 ड्रोन सौदीच्या सैन्याने यशस्वीरित्या अडवून नष्ट केले आहेत. सौदी अरेबियाने आपल्या हवाई हद्दीचे रक्षण करण्यासाठी हाय अलर्ट जारी केला असून लष्करी हालचाली वाढवल्या आहेत. या हल्ल्यांमुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.

 

हे ही वाचा : तिकिट हरवल्याचं सांगितलं अन् क्वार्टरवर नेऊन रेल्वे कर्मचाऱ्यानं तरुणीवर केला बलात्कार; नेमकं काय घडलं?

इस्त्राईल मधील अमेरिकन दूतावासाल आग

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मंगळवारी पहाटे इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर इस्रायलमधील अमेरिकन दूतावासाला भीषण आग लागल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली असून अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता टोकाला पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अमेरिकेसह त्यांच्या मित्र राष्ट्रांनीही प्रतिहल्ल्याची तयारी सुरू केली आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाच्या वळणाकडे लागले असून परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे.