Prakash Ambedkar on Narendra Modi : "पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिलपर्यंत थांबा. तुमच्या दोन रिल्स बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. त्या रिल्स येऊ द्यायच्या नसतील तर नरेंद्र मोदी यांनी खुर्ची खाली करावी. भाजपने भारताचे सार्वभौम टिकवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पायउतार करावे लागेल", असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. आंबेडकरांनी त्यांच्या भाषणाची क्लीप X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना निर्वाणीचा इशारा दिलाय. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, X वर पोस्ट करताना आंबेडकरांनी #EpsteinFiles #MujraModi हे दोन टॅग देखील वापरले आहेत.
ADVERTISEMENT
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, नरेंद्र मोदी तुमचे 15 वर्ष झाले आहेत. तुमचे सगळे गुलाम आहेत, याची मला जाणीव आहे. पण एप्रिलपर्यंत थांबा. तुमच्या दोन रील्स बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. त्या रील्स बाहेर येऊ द्यायच्या नसतील तर खुर्ची खाली करा.. आमच्यासमोर दोनच मार्ग आहेत. एकतर देशाला वाचवा. ते जर करायचं असेल तर तुम्हाला संपवा. तुम्हाला इज्जत वाचवायची असेल तर खुर्ची खाली करा. आम्ही इथल्या भाजपवाल्यांना सांगतोय, आम्ही तुमचा राजीनामा मागत नाहीत. सत्ता तुमचीच राहणार नाही. कारण लोकांना 5 वर्षांसाठी तुम्हाला निवडून दिलं आहे. तुम्ही निवडणूक घेणार नाही. सत्ता तुमचीच राहील. पण सत्ता राहत असताना देशाचं सार्वभौमत्व कायम राहिलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदींचा बळी द्यावा लागेल. उद्या होळी आहे, नरेंद्र मोदींचा बळी द्या, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बायकोला रील्स बनवण्याचं वेड, वैतागलेल्या नवऱ्यानं गळा आवळून संपवलं; हत्येआधी बनवलेला व्हिडीओ व्हायरल
ADVERTISEMENT











