राज्यसभा निवडणुकीत भाजपचं धक्कातंत्र, दोन अनपेक्षित चेहरे मैदानात, आदिवासी, धनगर, दलित, मराठा चेहऱ्यांना संधी

BJP second list of candidates for Rajya Sabha elections 2026 : राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा करताना भाजपने सोशल इंजिनिअरिंग केल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपने महाराष्ट्रातून आदिवासी, धनगर, दलित, मराठा चेहऱ्यांना संधी दिली आहे. आदिवासी आणि धनगर समाजातील नेत्यांना भाजपने संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतलाय. 

Rajyasabha Election

Rajyasabha Election

ऋत्विक भालेकर

04 Mar 2026 (अपडेटेड: 04 Mar 2026, 12:49 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यसभेसाठी भाजपचं सोशल इंजिनीअरिंग

point

आदिवासी, धनगर, दलित, मराठा चेहऱ्यांना संधी; पाहा उमेदवार यादी

BJP second list of candidates for Rajya Sabha elections 2026 : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवड समितीने राज्यसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. भाजपने मंगळवारी (दि.4) इतर राज्यासांठी 9 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज महाराष्ट्रातील 4 जागांसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, माया चिंतामण आणि रामराव वडकुते या चार नावांची घोषणा करण्यात आलीये. दरम्यान, या यादीमध्ये रामदास आठवले आणि विनोद तावडे हे चर्चेतील नावे होते. मात्र, दोन अनपेक्षित चेहऱ्यांना देखील भाजपने संधी दिली आहे. 

हे वाचलं का?

राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा करताना भाजपने सोशल इंजिनिअरिंग केल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपने महाराष्ट्रातून आदिवासी, धनगर, दलित, मराठा चेहऱ्यांना संधी दिली आहे. आदिवासी आणि धनगर समाजातील नेत्यांना भाजपने संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतलाय. 

राज्यसभेसाठी भाजपचं सोशल इंजिनीअरिंग, आदिवासी, धनगर, दलित, मराठा चेहऱ्यांना संधी.

माया चिंतामण इवनाते या नागपूरमधील एक प्रमुख आदिवासी नेत्या, माजी महापौर आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाच्या (NCST) माजी सदस्य आहेत. त्यांनी गोरेवाडा प्राणी उद्यानाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यास विरोध करून आदिवासी अस्मितेसाठी लढा दिला होता. त्या भाजपशी संबंधित असून, आदिवासींच्या हक्कासाठी कार्यरत आहेत. 

हेही वाचा : महाराष्ट्रातून विनोद तावडेंसह चौघांच्या नावाची घोषणा, राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर

तर रामराव वडकुते धनगर नेते आहेत. विधानपरिषदेचे माजी सदस्य होते. हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात होते. त्यांनी १५ ऑक्टोबर २०१९ रोजी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला. वडकुते यांची विधान परिषद सदस्य मुदत बाकी असताना राजीनामा देऊन भाजपात आले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांची भाजपच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

माया चिंतामण कोण आहेत?

नागपूरच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत. १५ डिसेंबर २००७ ते २३ डिसेंबर २००९ पर्यंत नागपूर महानगरपालिका मध्ये महापौर पद भूषवले..अनेक वर्षांपासून नागपूर शहर भाजप मध्ये सक्रिय आहे. शहर, प्रदेश भाजप मध्ये विविध पदावर कार्य करण्याचा अनुभव आहे. आदिवासी समाजातून येतात.
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग  ( NCST) च्या सदस्य पदी राहिलेल्या आहेत.  २०२६ निवडणुकीत नागपूर महानगरपालिका मध्ये प्रभाग १२ मधून भाजपच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत.  यापूर्वी सुद्धा अनेक वर्ष नागपूर महानगरपालिका मध्ये नगरसेवक राहिलेल्या आहेत.

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी पुढीलप्रमाणे

महाराष्ट्र : विनोद तावडे, रामदास आठवले, माया चिंतामण आणि रामराव वडकुते

बिहार : नितीन नवीन, शिवेश कुमार

आसाम : तेराश गोवाला, जोगेन मोहन

छत्तीसगड : लक्ष्मी वर्मा

हरियाणा : संजय भाटिया

ओरिसा : मनमोहन सामल, सुजीत कुमार

पश्चिम बंगाल : राहुल सिन्हा

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'आत चल, मी तुला चांगला ऊस देतो..' ऊसाच्या शेतात नेऊन 11 वर्षाच्या पुतणीवर बलात्कार, चुलत्याचं संतापजनक कृत्य

    follow whatsapp