मी सत्ताधारी आमदार, बाप कशाला काढता? भास्कर जाधव अन् सचिन कल्याणशेट्टींमध्ये विधानभवनात शाब्दिक चकमक VIDEO

मुंबई तक

04 Mar 2026 (अपडेटेड: 04 Mar 2026, 02:08 PM)

Bhaskar Jadhav vs Sachin Kalyanshetti : "सरकारी कर्मचारी विधानभवनाच्या जागेत खासगी लग्नाच्या पत्रिकांचे वाटप कसे काय करू शकतात?" असा सवाल करत भास्कर जाधव यांनी कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यामध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही  नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. 

Bhaskar Jadhav

Bhaskar Jadhav

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मी सत्ताधारी आमदार, बाप कशाला काढता?

point

भास्कर जाधव अन् सचिन कल्याणशेट्टींमध्ये विधानभवनात शाब्दिक चकमक VIDEO

Bhaskar Jadhav vs Sachin Kalyanshetti controversy ,मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे गट) आक्रमक आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामध्ये विधानभवनात मोठा वाद झालेला पाहायला मिळालाय. "सरकारी कर्मचाऱ्यांकडून बाकांवरुन येडरावकरांच्या मुलाची लग्न पत्रिकेचे वाटप केले जात होते. आमदारांची उपस्थिती नोंद केली जाते त्या बाकांवर पत्रिका ठेवल्या होत्या", असा आरोप भास्कर जाधव यांनी केला होता. या मुद्द्यावरुन ते आक्रमक झाले आणि भाजप आमदारासोबत त्यांचा वाद झाला.  

हे वाचलं का?

 

नेमका वाद कशामुळे झाला? 

दरम्यान, या प्रकारावर भास्कर जाधव यांनी तीव्र आक्षेप घेतला. "सरकारी कर्मचारी विधानभवनाच्या जागेत खासगी लग्नाच्या पत्रिकांचे वाटप कसे काय करू शकतात?" असा सवाल करत त्यांनी कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यामध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही  नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. 

हेही वाचा : 'लवकर ये आणि मला वाचव..' बहिणीचा भावाला फोन, भाऊ मदतीला गेला अन् दाजीने कात्रीने भोसकून केली हत्या

सचिन कल्याणशेट्टी काय म्हणाले? 

तुम्ही सिनिअर सदस्य आहात, बाप कशाला काढत आहात. तुम्ही बाप नाही काढायला पाहिजे, असं सचिन कल्याणशेट्टी भास्कर जाधव यांना बोलताना म्हणाले. 

भास्कर जाधव काय म्हणाले? 

भास्कर जाधव म्हणाले, इथं खासगी काम कसंकाय सुरु आहे? सरकारी नोकर हे काम कसं करु शकतात? तुमच्याकडून मला काही शिकायची गरज नाही. तुम्ही सत्ताधारी असूद्या किंवा मंत्र असूद्यात.. इथं खासगी काम कसं सुरु आहे? 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'लवकर ये आणि मला वाचव..' बहिणीचा भावाला फोन, भाऊ मदतीला गेला अन् दाजीने कात्रीने भोसकून केली हत्या