Mukhyamantri Majhi Ladki bahin Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असं विरोधकांनी अनेकदा महायुतीला डिवचलं होतं. पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच योजनेबाबत मोठं विधान केलं आहे. महायुती सरकारचा निवडणुकीत विजयी होण्यामागं या योजनेचं मोठं योगदान आहे. मात्र, आता हीच योजना बंद पडणार असल्याचा विरोधकांचा सूर आहे. याचवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जावई होता बेवडा सतत पत्नीला मारहाण करायचा, लेक आली माहेरी अन्... त्यानं सासऱ्यावरच पेट्रोल ओतून...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले एकनाथ शिंदे?
या योजनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बंदी आणली जाणार नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, राज्य सरकारने निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली जातील. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, निवडणुकीदरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतचे आश्वासनही टप्याटप्याने पूर्ण केले जाईल. नुकतंच महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, सरकारने प्रथमदर्शनी 26 लाख लाभार्थी आपात्र असल्याचं सांगितलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या योजनेवर आपलं मौन सोडलं आहे.
आदिती तटकरेंनी 26 लाख अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवली
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 26 लाख अपात्र लाभार्थ्यांची ओळख आदिती तटकरेंनी पटवून दिली होती. त्यानंतर अपात्र लाभार्थ्यांचा डेटा पडताळणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला होता. संबंधित अपात्र लाभार्थ्यांची माहिती आदिती तटकरेंनी एका सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती.
हे ही वाचा : ऑनर किलिंगनं नांदेड हादरलं! तरुणीचे विवाहबाह्य संबंध, बॉयफ्रेंडसोबत सापडली सासरच्या घरात, नंतर वडिलांनी खोल विहिरीतच दिलं ढकलून
त्यानंतर आदिती तटकरे म्हणाल्या होत्या की, या पुढील चौकशी पूर्ण झाल्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहील यावरही त्यांनी भर दिला.
ADVERTISEMENT
