मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची आज (26 फेब्रुवारी) निवड करण्यात आली. मुंबईतील वरळीत आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवारांची घोषणा करण्यात आली आणि त्यांची एकमताने निवडही झाली. पण याच निर्णयानंतर एका आणखी मोठ्या निर्णयाची यावेळी घोषणा करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
नुकतीच राज्यसभेची निवडणूक ही जाहीर झाली आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची एक जागा आहे. त्यामुळे याच जागेवर नेमकी कोणाला संधी मिळणार याबाबत बरेच दिवस खल सुरू होता. अखेर आजच्या राष्ट्रीय अधिवेशनात NCP चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष निवडीआधी NCP च्या कोअर कमिटीची काल (25 फेब्रुवारी) एक बैठक पार पडली. ज्यामध्ये राज्यसभेचा उमेदवार कोण असेल यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. याच बैठकीतील निर्णय हा प्रफुल पटेलांनी आज जाहीर केला. यावेळी प्रफुल पटेल यांनी जाहीर केलं की, 'आगामी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
प्रफुल पटेलांनी राज्यसभा उमेदवाराबाबत नेमकी काय घोषणा केली?
'एक महत्त्वाची सूचना मला आपल्या सगळ्यासमक्ष आणि या राष्ट्रीय अधिवेशनात करणं आवश्यक वाटतं. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी अत्यंत आत्मियतेने पण एका हिंमतीने सर्वांना अमूल्य मार्गदर्शन केलं आहे. मी त्यांचे आभार मानतो.'
हे ही वाचा>> मोठी बातमी: माणिकराव कोकाटेंनी सांगितलेलं तेच अखेर घडलं, NCP ला मिळाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष!
'अजितदादांच्या वेळेपासून त्यांनी एक कोअर कमिटी बनवली होती. संसदीय दलाच्या वतीने काही प्रमुख लोकांना काही जबाबदारी देण्यात आली होती. काल या कोअर कमिटीने.. ज्यामध्ये भुजबळ साहेब, तटकरे, मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांचा समावेश आहे. या आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय आम्ही एकमताने घेतला आहे.'
'हा निर्णय आम्ही आमच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत घेऊ इच्छित नव्हतो. त्यामुळे मी आता सांगू इच्छितो की, आगामी राज्यसभा निवडणूक जी घोषित झाली आहे, ज्यासाठी 5 मार्चपर्यंत अर्ज भरायचा आहे. त्या जागेसाठी पक्षाने निर्णय घेतला आहे की, पार्थ अजितदादा पवार हे आपल्या पक्षाचे उमेदवार असतील.'
हे ही वाचा>> दादांच्या मृत्यूनंतर सूनेत्राताई अॅक्टिव्ह मोडवर, सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात, अन् कॅबिनेटमधील 3 मोठ्या निर्णयांची चर्चा
'इथे आपले जमलेले जे सर्व आमदार आहेत त्यांच्या माध्यमातूनच ही निवडणूक होते. तर मी तुम्हा सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की, या निवडणुकीसाठी 36 मतांची आवश्यकता असते आणि आपल्याकडे 40 आमदार आहेत. चाळीसही आमदारांनी एकमताने आणि एक विचाराने पार्थ पवारांना आपले उमेदवार म्हणून निवडून आणावं. असं मी निवदेन करतो.' अशी घोषणा प्रफुल पटेल यांनी यावेळी केली आहे.
ADVERTISEMENT











