CM देवेंद्र फडणवीस विधानसभेत पुन्हा म्हणाले 'पुन्हा येऊ...', नेमकं काय घडलं?

CM Devendra Fadnavis: अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. पाहा ते नेमकं काय म्हणाले.

cm devendra fadnavis said again in maharashtra assembly we will come to power again what exactly happened

CM देवेंद्र फडणवीस

मुंबई तक

• 04:19 PM • 26 Feb 2026

follow google news

मुंबई: 'मी पुन्हा येईन...', हे देवेंद्र फडणवीस यांचं विधान महाराष्ट्रातील 2019 विधानसभा निवडणुकीनंतर प्रचंड चर्चेत आलं होतं. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय गणित ज्या पद्धतीने बदलली त्यामुळे तब्बल 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून दूर राहावं लागलं होतं. 2019 विधानसभा निवडणुकीआधी फडणवीसांनी मी पुन्हा येईन.. असं म्हणत आपणच मुख्यमंत्री पदी विराजमान होऊ असा एक प्रकारे दावा केला होता. पण त्यांना या पदापासून आणि काही काळ सत्तेपासून दूर राहावं लागलं होतं. याच दरम्यान, त्यांच्या 'पुन्हा येईन'च्या विधानावरून विरोधकांनी त्यांना अनेकदा चिमटेही काढले होते. दरम्यान, आज (26 फेब्रुवारी) मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत 'पुन्हा येऊ...' असं विधान केलं आहे. 

हे वाचलं का?

सध्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना 'पुन्हा येऊ...' असा दावा केला आहे. पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले. 

'पुन्हा येऊ...', पाहा विधानसभेत देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले...

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, '2021-22 मध्ये देशाच्या जीडीपीमध्ये आपली हिस्सेदारी 13.1 टक्के होती. ती 2023-24 मध्ये 13.5 टक्के झाली. 2024-45 मध्ये 13.8 टक्के झाली आणि आता 14 टक्क्याच्या जवळपास राहील असं आपला प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर आपली जी हिस्सेदारी आहे ही हिस्सेदारी निश्चितपणे वाढते आहे.'

हे ही वाचा>> 'टिपू सुलतानने 75 हजार हिंदूंची कत्तल केली..' विधानसभेत फडणवीसांचं दीड तास भाषण; नेमकं काय म्हणाले?

'देशाची अर्थव्यवस्था विस्तारत होत असताना आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की, पूर्वी औद्योगिक राज्य ही 4 होती. आता 10 च्या वर झालेली आहेत. सगळी राज्य स्पर्धा करत आहेत. अशाही परिस्थितीत आपला जीडीपीमधील आपला वाटा हा सातत्याने वाढतोय हे अत्यंत महत्त्वाचं आहे.' 

'मला असं वाटतं की, छत्रपती शिवरायांनी देखील आपल्याला जो महाराष्ट्र धर्म सांगितला तो आपण सगळे जाणतोच.. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा.. आहे तितुके जतन करावे.. पुढे आणीक मिळवावे.. महाराष्ट्र राज्य करावे जिकडे-तिकडे.. अशा पद्धतीने सगळ्या क्षेत्रात आपण महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न चालू आहे.'

हे ही वाचा>> 'Masti, Atrangii असले App...', चित्रा वाघांनी सभागृहात पुन्हा केली 'ही' मागणी

'पण मला असं वाटतं आपली कॅसेट जी आहे ती पुढे जातच नाही, ती अडकलेलीच आहे. गुजरातमध्ये उद्योग चालले आहेत, राज्यात रोजगार निर्मिती होत नाही.. रोड मॅप योग्य नाही. बरं उद्योग बाहेर चालले आहेत हे सांगताना तुम्हाला 2022 पासून नवीन उद्योगही सापडलेले नाहीत.' 

'तेच सांगत आहेत. 2022 पासून शंभर वेळा त्या उद्योगांच्या संदर्भात या सभागृहात, सभागृहाबाहेर सांगितलं तरी पुन्हा तुमची रेकॉर्ड तिथेच जाऊन अडकते.. तोच कुठला सॅफ्रॉनचा उद्योग.. म्हणजे आमचं सरकार यायच्या आधीच तो उद्योग बाहेर गेला होता. तरी आमच्यावर मारला आपला.. मला असं वाटतं की, अभ्यास करून थोडे विषय मांडले तर अधिक चांगले होते. किंवा कदाचित तुम्ही गोबेल्सचं ते तत्व वापरत असाल की, रोज खोटं बोललं की कधीतरी खरं वाटतं. त्या पद्धतीने चाललंय..' 

'तुम्ही जर आमचं विकसित महाराष्ट्राचं आमचं डॉक्यूमेंट वाचलं.. मी 1947 नाही बोलतंय थेट.. आम्ही सांगतोय 2029 जोपर्यंत हे सरकार आहे या टर्मचं, पुढच्या टर्मला पुन्हा येऊ...'

'2034 जेव्हा महाराष्ट्र 75 वर्षाचा होईल आणि 2047 अशा तिन्ही टप्प्यांचा उल्लेख यावेळी करण्यात आला आहे. प्रत्येक टप्प्यात आपल्याला काय करायंचय.. शेवटी जर तुम्ही प्लॅनिंग करणार नाही, दिशा ठरवणार नाही.. तर तुम्ही तिथे पोहचाल कसे?' 

'सगळ्यात महत्त्वाचा फरक काय ते पाहा. आपण फक्त प्लॅनिंग करून पोहोचलो नाही. आता आपल्या अर्थव्यवस्थेची दिशा त्या दिशेने न्यायची आहे.' असं फडणवीस यावेळी म्हणाले. 

    follow whatsapp