शिंदेंचा आमदार बिबट्यावर गेला धावून, स्टंटबाजी बेतली असती जीवावर.. कॅमेऱ्यात सगळंच झालं कैद! VIDEO

MLA Chandrakant Patil and Leopard Video : जळगाव जिल्ह्यातील आमदार चंद्रकांत पाटील चक्क काठी घेऊन बिबट्याच्या मागे धावताना पाहायला मिळाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आलाय.

MLA Chandrant Patil

MLA Chandrant Patil

मुंबई तक

13 Apr 2026 (अपडेटेड: 13 Apr 2026, 03:31 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिंदेंचा आमदार बिबट्यावर गेला धावून, स्टंटबाजी बेतली असती जीवावर..

point

कॅमेऱ्यात सगळंच झालं कैद! VIDEO

MLA Chandrakant Patil and Leopard Video : बिबट्याला पकडण्यासाठी हातात दंडुका घेवून मैदानात उतरलेल्या शिंदेंच्या आमदाराची स्टंटबाजी त्यांच्याच जीवावर बेतली असती. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरातील बस स्थानक परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण होतं. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिक प्रशासनासह वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. तरी देखील जीव धोक्यात घालून आमदार चंद्रकांत पाटलांनी स्टंटबाजी केली.  

हे वाचलं का?

बिबट्याला पकडण्यासाठी एक पिंजरा लावण्यात आला होता. बिबट्याला डार्ट म्हणजे बेशुद्धीचं इंजेक्शनही मारण्यात आलं होतं. त्याच दरम्यान, बिबट्या निसटत असताना चंद्रकांत पाटील यांनी बिबट्याला काठीने मारलं. यात ते किरकोळ जखमी झाले. आमदार पाटील यांची बिबट्याला पकडण्याच्या स्टंटबाजी अंगलट आली असती मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, अशी चर्चा आहे. दरम्यान, बिबट्याला काठीने मारण्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, बिबट्या एका व्यक्तीवर हल्ला करण्याच्या तयारीत होता म्हणून त्याला काठीने मारलं. तर, एकनाथ खडसे यांनी टीका करत म्हटलंय की, डार्ट मारलं असताना बिबट्याला काठीने मारणं कायदेशीदृष्ट्या नियमबाह्य असून गुन्हा ठरू शकतो.

बिबट्या शुद्धीत असताना जर त्याला पकडला असतं तर आमदारांचं कौतुकच केलं असतं - खडसे 

मुक्ताईनगर येथील बिबट्या पकडण्यावरून माजी मंत्री एकनाथ खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपलेली पाहायला मिळाली. "बिबट्याला इंजेक्शन दिलेलं होतं. त्यानंतरही त्याला काठीने मारहाण केली हे नियमबाह्य असून गुन्हा आहे. बिबट्या शुद्धीत असताना जर त्याला पकडला असतं तर आमदारांचं कौतुकच केलं असतं. मात्र त्यांनी काठीने मारहाण हे वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर घडलं हे चुकीचं आहे. बिबट्या पकडला हे चांगलंच आहे मात्र त्यासाठीची कारवाई नियमबाह्य झाली.", असं माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले आहेत. 

एकनाथ खडसे हा विकृत विचाराचा माणूस आहे - चंद्रकांत पाटील 

"एकनाथ खडसे पोटदुखी माणूस आहे, त्यांची पोटदुखी कधी थांबणार नाही. कौतुक करण्याचे धाडस एकनाथ खडसेंमध्ये नाही. कारण एकनाथ खडसे हा माणूस नाही तर तो विकृत विचाराचा माणूस आहे" या शब्दात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्यावर खोचक टीका केली आहे. बिबट्याला पकडण्यावरून एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

सततचे टोमणे आणि लिव्हरचा आजार.., पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, तरुणीने स्वतःच रचला बनाव