सततचे टोमणे आणि लिव्हरचा आजार.., पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, तरुणीने स्वतःच रचला बनाव
Pandharpur Crime News : पंढरपुरात तरुणीवर अॅसिड हल्ल्याची बातमी समोर आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणात मोठा ट्वीस्ट आलाय. तरुणीने स्व:तच या हल्ल्याचा बनाव रचल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सततचे टोमणे आणि लिव्हरचा आजार.., पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणाला वेगळं वळण
तरुणीने स्वतःच हल्ल्याचा रचला बनाव
Pandharpur Crime News : पंढरपूर शहरात रविवारी (दि.13) एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी रात्रभर केलेल्या सखोल तपासानंतर या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक माहिती समोर आली आहे. संबंधित तरुणीवर कोणताही हल्ला झाला नसून, तिने स्वतःच हा बनाव रचल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. घरगुती वादातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले असून, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे.
पंढरपूरात काल रात्री एका तरुणीवर अज्ञाताने ॲसिड फेकल्याची बातमी समो आली आणि संपूर्ण शहर हादरून गेलं. घटनेचं गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी तातडीने तपासाची सूत्रं हालवली. मात्र, जसा तपास पुढे सरकला, तसं सत्य समोर येऊ लागलं. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, कोणतीही संशयास्पद व्यक्ती तिथे दिसून आली नाही.
पीडित तरुणीने दिलेल्या जबाबातील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय बळावला. अखेर निर्भया पथक आणि डॉक्टरांच्या उपस्थितीत झालेल्या चौकशीत या मुलीने स्वतःच हा बनाव रचल्याची कबुली दिली. घरातील सततचे टोमणे आणि लिव्हरच्या आजारपणामुळे आलेल्या मानसिक तणावातून तिने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना, पंढरपूरमधील या घटनेने पोलिसांना आरोपीला पकड्यासाठी मोठी धावपळ करावी लागत होती. मात्र, घरच्यांना धडा शिकवण्यासाठी किंवा वैयक्तिक नैराश्यातून असे टोकाचे पाऊल उचलणे किती महागात पडू शकते, हेच या घटनेतून अधोरेखित झाले आहे. सध्या या तरुणीवर उपचार सुरू असून पंढरपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत या घटनेमागचे गूढ उकलले आहे.









