NCP सोडलेल्या नेत्याची 'त्या' पदावरील नेमणूक रोखा, सूनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Sunetra Pawar letter to CM Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून म्हाडाच्या 'सेल्फ-ग्रुप रिडेव्हलपमेंट ऑथॉरिटी'च्या उपाध्यक्षपदी आनंद परांजपे यांची केलेली नेमणूक रोखण्याची विनंती केली आहे. आनंद परांजपे यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Sunetra Pawar letter to CM Devendra Fadnavis

Sunetra Pawar letter to CM Devendra Fadnavis

मुंबई तक

29 May 2026 (अपडेटेड: 29 May 2026, 02:17 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

NCP सोडलेल्या नेत्याची 'त्या' पदावरील नेमणूक रोखा

point

सूनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Sunetra Pawar letter to CM Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या एका पत्रामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पत्राद्वारे सुनेत्रा पवार यांनी म्हाडाच्या 'सेल्फ-ग्रुप रिडेव्हलपमेंट ऑथॉरिटी' (SGRA) च्या उपाध्यक्षपदावर आनंद परांजपे यांची होणारी नेमणूक तातडीने रोखण्याची विनंती केली आहे. आनंद परांजपे हे काही दिवसांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते, मात्र त्यांनी नुकताच त्या पक्षाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : बाप मुलीच्या सासरी गेला अन् हादरलाच, सहा महिन्यांपूर्वीच सगळं संपलं होतं; दोषी कोण?

नेमणुकीच्या शिफारशीला स्थगिती देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र

आनंद परांजपे हे राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांच्या नावाची या पदासाठी शिफारस करण्यात आली होती, परंतु आता त्यांच्या पक्षबदलानंतर त्यांना हे पद दिले जाऊ नये, अशी भूमिका सूनेत्रा पवार यांनी घेतलीये. समन्वय समितीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली होती आणि त्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता की, या नेमणुकीच्या शिफारशीला स्थगिती देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन कळवावे.

हेही वाचा : बुलढाणा : शिवानीचा मर्डर केला म्हणून तिचे वडील अन् भाऊ तुरुंगात, पण ती जिवंत निघाली!

आनंद परांजपे यांच्या पक्षप्रवेशाचा घटनाक्रम 

आनंद परांजपे यांचा राजकीय प्रवास पाहिला असता, 2012 मध्ये त्यांनी शिवसेनेला रामराम केला होता. त्यानंतरच्या प्रदीर्घ काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय राहिले. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणांनुसार त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही जुनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या भेटीनंतर शिंदे गटाने त्यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आणि खासदार श्रीकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षात प्रवेश करताना परांजपे यांनी आपण कोणत्याही पदाच्या अपेक्षेने प्रवेश केला नसून, आपला डीएनए हा शिवसेनेचाच असल्याचे स्पष्ट केले होते. आपल्याला पक्ष संघटनेत जे काम दिले जाईल, ते आपण जोमाने पूर्ण करू आणि आपण आपल्या 'स्वगृही' परतलो आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.

मात्र, आता सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्या नेमणुकीवर आक्षेप घेतल्याने परांजपे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांची शिफारस झाल्याने, आता पक्षात बदल झाल्यावर ती शिफारस रद्द करणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.