Sonam Wangchuk : सीजेपीच्या आंदोलनाला मोठे यश प्राप्त झाले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिल्याने सीजेपीच्या आंदोलनाला मोठे यश प्राप्त झाले आहे. या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली ती सोनम वांगचुक यांनी. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर वांगचुक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हा लोकशाहीचा विजय असल्याचं त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर वांगचुक नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
आता सुधारणांकडे...
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये वांगचुक म्हणाले की, 'हा लोकशाहीचा विजय आहे! थेट लोकशाही... थेट रस्त्यावरून मिळालेली. हा शांतता, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा (चिकाटीचा) विजय आहे. CJP आणि देशातील 'जेन झी'चे (Gen Z) हार्दिक अभिनंदन! तसेच, भीती आणि भीती वाटण्याचीही भीती मनातून काढून टाकून देशाच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेल्या सर्व नागरिकांचे मनापासून आभार. उत्तरदायित्वाकडून (जबाबदारी निश्चित करण्याकडून), आता सुधारणांकडे!'
हे ही वाचा : प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दिपकेची पहिली प्रतिक्रिया, सरकारकडे 'त्या' मागण्या
तोवर हटणार नाही
दरम्यान, अभिजीत दिपके यांनीही हा लोकशाहीचा विजय असल्याचं म्हटलं आहे. मात्र जोपर्यंत आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळत नाही आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलेल्या पोलिसांविरोधात कारवाई होत नाही, तोवर आम्ही मागं हटणार नाही, असं म्हटलं आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिल्लीत मोठ्या घडामोडी
प्रधानांनी काय म्हटलं?
धर्मेंद्र प्रधान यांनी एक्सवर पोस्ट करत आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. त्यांनी लिहिलं की, देशातील आकांक्षा, भावना आणि रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारतातील तरूण पिढीची स्वप्ने साकार करणे हा आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजित जीवनाचा नैतिक संकप्ल राहिलेला आहे. तसेच पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली मला जी काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा मी आभारी आहे.
ADVERTISEMENT












