प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दिपकेची पहिली प्रतिक्रिया, सरकारकडे 'त्या' मागण्या

मुंबई तक

• 03:31 PM • 25 Jul 2026

Abhijit Dipke : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या जंतरमंतर मैदानासह देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आंदोलन स्थळावरून अभिजीत दिपके यांनी सरकारला सुनावलं आहे. झुकता है मगर झुकलेवाला चाहिए. यांनी स्वत:ला बादशाह समजलं होतं, मात्र यांना आपणच बादशाह केलं होतं. ही लोकशाही आहे, लोकशाहीत कोणालाच घाबरायचं नाही. यासोबत त्याने आणखी काही मागण्या केल्या आहेत.

Abhijit Dipke

Abhijit Dipke

Google CTA

बातम्या हायलाइट

point

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा

point

देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण

point

अभिजीत दिपकेच्या तीन मागण्या

Abhijit Dipke: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या जंतरमंतर मैदानासह देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आंदोलन स्थळावरून अभिजीत दिपके यांनी सरकारला सुनावलं आहे. झुकता है मगर झुकलेवाला चाहिए. यांनी स्वत:ला बादशाह समजलं होतं, मात्र यांना आपणच बादशाह केलं होतं. ही लोकशाही आहे, लोकशाहीत कोणालाच घाबरायचं नाही. यासोबत त्याने आणखी काही मागण्या केल्या आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिल्लीत मोठ्या घडामोडी

अभिजीत दिपकेसह विद्यार्थ्यांची सरकारकडे 'त्या' मागण्या

पुढे अभिजीत दिपकेसह कॉक्रोच जनता पार्टीने सांगितलं की, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने एक कोटींची मदत करावी. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी राजीनामा द्यावा. ज्यात डिसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा, सचिन शर्मा यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून लाठी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई व्हावी. 

तसेच 20 जुलै 2026 रोजी विद्यार्थ्यांवर जी कारवाई करण्यात आली होती. त्या सर्व कारवाया सरकारने मागे घ्याव्यात अशा मागण्या अभिजीत दिपकेसह आंदोलनातील विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.   

हे ही वाचा : जंतर-मंतरवर पुन्हा एकदा तणाव, आंदोलक आणि पोलीस आमने-सामने; काय घडलं?

त्यानंतर दिपकेनं सरकाला धारेवर धरत सांगितलं की, मला मागील एका महिन्यापासून मोठ मोठे नेते म्हणाले की, हे कधीपर्यंत आंदोलन सुरू राहिल? हे लोक नाही देणार राजीनामा. हे सरकार कोणाचंच ऐकत नाही. आपलंच खरं करतं हे सरकार, असं म्हणत सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला.