जंतर-मंतरवर पुन्हा एकदा तणाव, आंदोलक आणि पोलीस आमने-सामने; काय घडलं?

मुंबई तक

दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनादरम्यान टॉलस्टॉय मार्गावर आंदोलक आणि पोलिसांमध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

ADVERTISEMENT

CJP Protest Delhi
CJP Protest Delhi
Google CTA

बातम्या हायलाइट

point

जंतर-मंतरवर पुन्हा एकदा तणाव!

point

आंदोलक आणि पोलीस आमने-सामने

point

काय घडलं?

CJP Protest Delhi : दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनादरम्यान टॉलस्टॉय मार्गावर आंदोलक आणि पोलिसांमध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि 'रॅपिड ॲक्शन फोर्स'ने (RAF) अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यापूर्वीही या मार्गावर पोलीस आणि आंदोलकांमध्ये दोनदा चकमक झाली होती. सध्या पोलीस परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत असून सुरक्षारक्षक घटनास्थळी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

इंस्टाग्रामचा गैरवापर

दरम्यान, जंतर-मंतरवर सुरू असलेल्या 'CJP'च्या आंदोलनासंदर्भात दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वपूर्ण माहिती दिली. पोलीस उपायुक्तांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यांपासून जंतर-मंतरवर हे आंदोलन सुरू असून, यादरम्यान सोशल मीडियाचा, विशेषतः 'इन्स्टाग्राम'चा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे.

डीपफेक व्हिडिओ