नवी दिल्ली: देशाच्या राजकारणात गेल्या बारा वर्षांत भाजपची 'चाणक्यनीती' अनेकदा यशस्वी ठरली पण यावेळी समोर विरोधी पक्ष नव्हता समोर होती विद्यार्थ्यांची एकजूट. मग असा प्रश्न पडतो विद्यार्थ्यांच्या फोर्ससमोर भाजपची चाणक्यनीती का चालली नाही?
ADVERTISEMENT
विरोधकांचा आमदार फोडायचा असेल, सरकार वाचवायचं असेल, निवडणूक जिंकायची असेल किंवा एखादं आंदोलन थंड करायचं असेल तेव्हा अनेक जण म्हणतात थांबा.. अजून मोदी-शाहांची चाल बाकी आहे.
कारण गेल्या अनेक वर्षांत देशाने एक पॅटर्न पाहिला आहे. विरोधकांनी घोषणा दिल्या, रस्त्यावर आंदोलन केलं, टीव्हीवर आरडाओरडा झाला आणि शेवटी राजकीय चेकमेट मोदी-शाहांनीच दिला.
चाणक्य नीतीला शह देणारे नवे खेळाडू
पण यावेळी पहिल्यांदाच प्रश्न विचारला जातोय चाणक्य नीतीला शह देणारे नवे खेळाडू आहेत तरी कोण?
राजकारणात भाजपच्या रणनीतिची तुलना ही अनेकदा बुद्धिबळाशी केली जाते. पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल आणि विरोधकांना कळायच्या आत चेक आणि मेट!
हे ही वाचा>> 'मोदींना भेटून मी सांगितलेलं की राजीनामा घ्या किंवा...', पवारांनी आता सांगितलं 'त्या' बैठकीत काय घडलं!
महाराष्ट्र असो, मध्य प्रदेश असो, कर्नाटक असो किंवा दिल्लीचं राजकारण मोदी-शाहांची जोडी अनेकदा प्रतिस्पर्ध्यापेक्षा दोन पावलं पुढेच असायचं.
पण यावेळी समोर विरोधी पक्ष नव्हता तर समोर होते अत्यंत एनर्जेटिक आणि अत्यंत इनोव्हेटिव्ह विद्यार्थी. या विद्यार्थ्यांकडे सत्ता नव्हती, पैसा नव्हता मोठी संघटना नव्हती. पण एक गोष्ट होती भविष्याचा प्रश्न.
ज्या क्षणी आंदोलनाला विद्यार्थ्यांच्या भावनांची जोड मिळाली त्याच क्षणी राजकीय गणित बदलायला सुरुवात झाली.
दरम्यान, CJP ने आंदोलनाला सतत नवा ऑक्सिजन दिला. रोज नवा मुद्दा, रोज नवी रणनीती, रोज नवा दबाव आणि सोशल मीडियावर अशी लाट तयार झाली की आंदोलन हा फक्त दिल्लीचा विषय राहिला नाही तो देशभरातील विद्यार्थ्यांचा विषय बनला.
आता कल्पना करा ज्या रणनीतीने अनेक राज्यांतील राजकीय विरोधक निष्प्रभ झाले त्याच रणनीतीसमोर उभे होते हजारो विद्यार्थी.
...तर बुद्धीबळात सगळ्या चाली बदलतात!
बुद्धिबळात एक नियम असतो समोरचा खेळाडू तुमच्यासारखा विचार करत नसेल तर तुमच्या सगळ्या चाली बदलतात.
कदाचित हीच या आंदोलनाची सर्वात मोठी ताकद ठरली. कारण विद्यार्थ्यांकडे गमावण्यासारखं सरकार नव्हतं, ना त्यांना निवडणुका जिंकायच्या होत्या. त्यांची फक्त एकच मागणी होती, न्याय.
हे ही वाचा>> 12 वर्षातील सर्वात मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा, केंद्र सरकारला मोठा झटका
आणि.. राजकीय रणनीतीची सगळी पुस्तकं एक गोष्ट शिकवतात की, विरोधकांना हरवणं सोपं असतं पण भावना हरवणं कठीण असतं.
आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. विरोधकांनी त्याला आंदोलनाचा विजय म्हटलं. सत्ताधाऱ्यांनी वेगळी भूमिका मांडली. पण राजकीय चर्चेत एक प्रश्न कायम राहिला की, यावेळी मोदी-शाहांची प्रसिद्ध 'चाणक्य नीती' का फेल ठरली? आणि हाच प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
आता ही फक्त एका मंत्र्याच्या राजीनाम्याची कहाणी नाही तर ही कहाणी त्या पिढीची कथा आहे ज्यांना अनेकांनी 'मोबाइलमध्ये गुंतलेली जनरेशन' समजलं. पण याच जनरेशने रस्त्यावर उतरून ते करून दाखवलं जे गेल्या 12 वर्षात घडलं नव्हतं.
ADVERTISEMENT












