'युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय', प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांचं ट्विट

मुंबई तक

25 Jul 2026 (अपडेटेड: 25 Jul 2026, 04:11 PM)

Sharad Pawar On Dharmendra Pradhan Resign : देशात सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला असंख्य विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला होता. दिल्लीत एका महिन्यापासून विद्यार्थ्यांसह कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन सुरू ठेवले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची सरकारने दखल घेतली. नंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, त्यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करत पोस्ट शेअर केली. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी 'युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय', असल्याचं म्हटलं. 

Sharad Pawar On Dharmendra Pradhan Resign

Sharad Pawar On Dharmendra Pradhan Resign

Google CTA

बातम्या हायलाइट

point

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला यश

point

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल

point

शरद पवारांचं ट्विट चर्चेत

Sharad Pawar On Dharmendra Pradhan Resign : देशात सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला असंख्य विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला होता. दिल्लीत एका महिन्यापासून विद्यार्थ्यांसह कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन सुरू ठेवले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची सरकारने दखल घेतली. नंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, त्यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करत पोस्ट शेअर केली. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी 'युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय', असल्याचं म्हटलं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दिपकेची पहिली प्रतिक्रिया, सरकारकडे 'त्या' मागण्या

शरद पवार यांचं पोस्ट जशीच्या तशी 

शरद पवार यांनी ट्विट करत लिहिलं की, "NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग 28 दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. 

आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिल्लीत मोठ्या घडामोडी

तसंच, विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मनःपूर्वक आभार. देशातील लोकशाहीने कात टाकली आहे, आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चितपणे नमूद करावसं वाटतं," असं त्यांनी ट्विट केलं.