नेत्यांना फोनवर शिवीगाळ करणाऱ्या रमेश पाटलांना किती मतं मिळाली?

मुंबई तक

• 10:02 AM • 29 Oct 2026

Vidhan parishad election results : नेत्यांना फोन करून जाब विचारणारे आणि तिरडीवर झोपून उमेदवारी अर्ज दाखल करणारे रमेश पाटील विधान परिषद निवडणुकीत किती मतं मिळवू शकले? जाणून घ्या त्यांच्या निवडणुकीतील कामगिरीबद्दल.

Ramesh Patil

Ramesh Patil

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नेत्यांना फोनवर शिवीगाळ करणाऱ्या रमेश पाटलांना किती मतं मिळाली?

point

रमेश पाटील विधान परिषद निवडणुकीत किती मतं मिळवू शकले?

Vidhan parishad election results : छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अनेक उमेदवारांच्या कामगिरीकडे लक्ष लागले होते. या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश पाटील यांनी मोठा विजय मिळवला. मात्र, या निवडणुकीत सोशल मीडियावर चर्चेत असलेले रमेश पाटील, रविराज साबळे यांच्या कामगिरीचीही मोठी चर्चा रंगलीये. रमेश पाटील हे अनेक दिवसांपासून विविध नेत्यांना फोन करून जाब विचारण्याच्या शैलीमुळे चर्चेत होते. काही वेळा त्यांच्या बोलण्याची मर्यादा ओलांडली जात असल्याचीही चर्चा व्हायची. निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेल्या आगळ्यावेगळ्या शक्तिप्रदर्शनामुळेही लक्ष वेधून घेतले होते. तिरडीवर झोपून त्यांनी विभागीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या कृतीची चर्चा झाली असली, तरी मतदारांनी त्यांना किती पसंती दिली, याची उत्सुकता होती.

हे वाचलं का?

एकूण 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, रमेश पाटलांना किती मतं? 

रमेश पाटील यांना या निवडणुकीत पहिल्या पसंतीची एकूण 900 मतं मिळाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत त्यांना 240 मतं मिळाली होती. दुसऱ्या फेरीअखेर त्यांची मतसंख्या 590 वर पोहोचली. तिसऱ्या फेरीअखेर त्यांना 900 मतं मिळाली. पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे त्यांचा क्रमांक आठवा होता. या मतदारसंघात एकूण 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या सर्व उमेदवारांमध्ये रमेश पाटील यांना मिळालेल्या मतांची संख्या चर्चेचा विषय ठरली. प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष मतदान यांमधील फरक या निकालातून दिसून आला. नेत्यांना फोन करून प्रश्न विचारणाऱ्या रमेश पाटलांना मतदारांनी किती पसंती दिली, याचे उत्तर 900 मतांच्या आकड्यातून मिळाले.

हेही वाचा : नागपूर पदवीधर : शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने गेम पलटवला, अन् सपकाळांनी फडणवीसांना डिवचलं

निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, रमेश पाटील यांनी 2004 मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात आयकर विवरणपत्र भरले नसल्याची माहितीही नमूद करण्यात आली होती. मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअखेर पहिल्या पसंतीच्या 900 मतांसह ते आठव्या क्रमांकावर होते. त्यांच्यापेक्षा अधिक मतं मिळवणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रतापसिंह पाटील, सतीश चव्हाण, रविराज साबळे, दिलीप घुगे, सुशील घोटे, विठ्ठल भुजंगराव तळेकर आणि बालाजी सरस्वती रामचंद्र पाटील चाकूरकर यांचा समावेश होता. बालाजी पाटील यांना 989 मतं मिळाली होती, तर विठ्ठल तळेकर यांना 1,352 मतं मिळाली होती. सुशील घोटे यांना 5,681 मतं मिळाली होती.

रमेश पाटील यांचा मतदान यंत्रणेतील क्रमांक 35 होता. मात्र, मतमोजणीतील त्यांच्या कामगिरीनुसार ते पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आठव्या क्रमांकावर राहिले. पुढील बाद फेरीत त्यांची निवडणुकीतील उमेदवारी संपुष्टात आली. एकीकडे नेत्यांना फोन करून जाब विचारणे, सोशल मीडियावर चर्चेत राहणे आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना वेगळ्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन करणे यामुळे रमेश पाटील यांच्याकडे लक्ष वेधले गेले होते. मात्र, या प्रसिद्धीचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला नाही. पहिल्या पसंतीची 900 मतं मिळाल्यानंतर त्यांना बाद फेरीत निवडणुकीतून बाहेर पडावे लागले. त्यामुळे चर्चेत असलेल्या या उमेदवाराला पदवीधर मतदारांनी प्रत्यक्ष मतदानातून किती पाठिंबा दिला, हे निकालातून स्पष्ट झाले.