Sunetra Pawar on Baramati By-Election : "दादा नसतानाची बारामतीतील ही पहिलीच निवडणूक आहे. ही निवडणूक बारामतीकरांची आहे. बारामतीकरांनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे. तुमचे दादांवर असलेले प्रेम आणि निष्ठा उभ्या देशाने पाहिलेली आहे. दादांच्या आठवणींना साक्षी ठेऊन त्यांच्या विचारांना अनुसरुन सतत कार्यरत राहण्याचा माझा संकल्प केलेला आहे. आदरणीय वळसे पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे एक महिला म्हणून मी जबाबदारी पार पाडू शकेन की नाही? असा संशय अनेकांना होता. मात्र, दादांच्या आशीर्वादाच्या रुपाने बारामतीची जनता माझ्या मागे उभी राहिली. जनतेनेचं मला लढण्याचं आणि उभं राहण्याचं बळ दिलं. ज्या परिवाराने राज्याला पहिलं महिला धोरणं दिलं. त्या परिवाराची मी सून आहे. महिला म्हणून कोणीही माझ्या कामाचं मूल्यमापन करु नये, असं मला वाटतं", असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची आज (दि.12) पहिली प्रचार सभा पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री आदिती तटकरे, आमदार सना मलिक, जय पवार उपस्थित होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बेडरुम व्हिडीओ अन् 2020 चं ते एक सिक्रेट..,प्रियंका नवऱ्याला कुत्सितपणे बोलायची; जमीनीवर झोपायला लावायची
यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सागतात, कठीण परिस्थितीत राज्याची आर्थिक घडी बसवण्याचे कसब फक्त दादांमध्येच होतं. त्यामुळे महायुती सरकारला लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवता आली. ती योजना आजही चालू आहे. दादांच्या या आर्थिक शिस्तीमुळे राज्यातील दोन कोटी लाडक्या बहीणींना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत मिळत आहे. त्यामुळेच आज दादांवरच्या प्रेमापोटी लाडक्या बहिणी आज येथे जमलेल्या आहेत. दादांसारखा दादा माणूस एकच... दुसरं कोणीही होऊ शकत नाही. दादांनी दाखवलेला मार्ग ..त्या मार्गावरच आपण जनसेवा करणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. मी या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार आणि महायुतीची उमेदवार म्हणून दादांचे कार्य पुढे नेण्यासाठी तुमच्यासमोर उभी आहे. ही केवळ पोटनिवडणुकच नाही तर ऐतिहासिक जबाबदारी देखील आहे. ती जबाबदारी माझ्यावर जशी आहे, तशीच मतदार म्हणून तुम्हा बारामतीकरांवर देखील आहे.
पुढे बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, माझ्यासाठी बारामतीचा विकास हा केंद्रबिंदु आहे. त्याच बरोबर राज्यातील पीडित-शोषित, वंचित आणि महिला-युवक यांच्या कल्याणासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. बारामतीला सर्वात विकसित करण्याचा संकल्प दादांचा संकल्प आपल्याला सर्वांना मिळून पुढे न्यायचा आहे. त्याला तुम्ही नक्कीच पाठबळ द्याल. याची मला खात्री आहे. तालुक्यातील जिरायत भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांना जिरायती हा शब्द मोडून काढायचा होता. त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
लग्नाचे आमिष, बलात्कार अन् गर्भपात..कॉन्ट्रॅक्टरने महिला बँक कर्मचाऱ्याला 'असं' अडकवलं जाळ्यात
ADVERTISEMENT











