Rahul Gandhi : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 'छात्रो की गूँज' या राहुल गांधींच्या सभेत झेन झींनी आपली उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना त्यांनी आंदोलनातील घडलेल्या घटनेबाबत दुजोरा दिला. या सभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारच्या शिक्षणाच्या व्यवस्थापनेवर प्रश्न उपस्थित केलेत. तसेच त्यांनी बेरोजगारी, पतपुरवठा, वाढत्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून चिंता व्यक्त करत आरएसएससह सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : चिकनमध्ये कंडोम आढळल्याचा जोडप्याचा आरोप, रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी तरुणाई आणि डेटाच्या भूमिकेबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "तरुण अधिक डेटा म्हणजे हे 21 वं शतक आहे. देशातील तरुणांची लोकसंख्या आणि त्यांचा डेटा हा भारताचे भविष्य घडवण्यात मोठी मदत करू शकतात". पुढे राहुल गांधी यांनी देशातील तरुणांना रोजगाराच्या संधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. "आपण शिक्षण घेता, मात्र आपल्याला नोकरी मिळत नाही", असं ते म्हणाले.
'तरुणांना शिक्षण आणि रोजगार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो'
पुढे त्यांनी दावा केला की, 'दर 1000 तरुणांमागे केवळ 12 जणांना नोकऱ्या मिळतात, बीए आणि एमए सारख्या पदव्या घेतलेल्या तरुणांना रोजगाराच्या संधी दिल्या जातात का?", असा प्रश्न उपस्थित केला होता. "शिक्षणासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जात असल्याचं सरकार म्हणतंय, मग तरुणांना शिक्षण आणि रोजगार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे", पुढे त्यांनी असा आरोप केला की, "सरकारकडून रोजगाराची कोणतीही हामी दिली जात नाहीये."
राहुल गांधी यांनी याच सभेत लघुउद्योद आणि विशेषकरून कर्जाबाबत मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. "भारतीय बँका विद्यार्थ्यांना कधीही कर्ज देणाऱ्या नाहीत. 90 टक्के व्यवसायिकांना कर्ज दिले जात नाही. यामुळे तरुणांसाठी आणि लघुउद्योगांना अडचणींचा सामना करत आहे. 150 सरकारी नोकऱ्यांमध्ये एकाला कुठेतरी सरकारी नोकरी दिली जातेय".
जीएसटीच्या धोरणाला धरले जबाबदार
अशातच त्यांनी जीएसटी आणि चुकीच्या धोरणाला जबाबदार धरले आणि भारतातील खाजगीकरण वाढवल्याचा देखील दावा केलाय. पुढे त्यांनी एआयमुळे तरुणांच्या रोजगाराच्या संधीवर मोठा परिणाम होतोय, तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीयेत.
हे ही वाचा : शिक्षक नवऱ्याने बायकोला पाण्यात बुडवून मारलं, आरोपीनं बनाव रचला पण..
पुढे त्यांनी आरोप केला की, "सरकार नागरिकांना डेटा घेतं, त्यात तुमचं दु:ख असतं आणि संपत्ती मात्र त्यांचीच असते". पुढे त्यांनी राहुल गांधी यांनी आरएसएसवर निशाणा साधला, त्यांनी दावा केला की, "आज भाजपच्या बँकेत 10 हजार कोटी रुपये शिल्लक आहेत, व्होटचोरी सुरूच आहे". पुढे त्यांनी आरएसएसला देखील धारेवर धरलं आणि म्हणाले की, "प्रत्येक संस्थेत आरएसएसचेच लोक आहेत", असं म्हणत त्यांनी आरएसएस आणि सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
ADVERTISEMENT












