बेडरुम व्हिडीओ अन् 2020 चं ते एक सिक्रेट..,प्रियंका नवऱ्याला कुत्सितपणे बोलायची; जमीनीवर झोपायला लावायची

मुंबई तक

Crime News : देवकृष्ण पुरोहित हत्याकांडात पत्नीच्या क्रूर वर्तनाचे व्हिडिओ समोर आले असून, अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीची कट रचून हत्या केल्याचे उघड झाले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

बेडरुम व्हिडीओ अन् 2020 चं ते एक सिक्रेट..,

point

प्रियंका नवऱ्याला कुत्सितपणे बोलायची; जमीनीवर झोपायला लावायची

Crime News : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील गोंदीखेडा गावात घडलेल्या देवकृष्ण पुरोहित हत्याकांडाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या प्रकरणाचे एकामागून एक पदर उगलडत असून, त्यातून द्वेष आणि हत्येच्या कटाची एक भयानक स्टोरी समोर येत आहे. या मर्डर मिस्ट्रीमध्ये आता काही असे बेडरूम व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यांनी हे स्पष्ट केले आहे की घराच्या भिंतींच्या आत मृत्यूचे तांडव अचानक घडले नाही, तर त्याची पटकथा दीर्घकाळापासून लिहिली जात होती. देवकृष्णची बहीण ज्योतीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले हे व्हिडिओ आता पोलिसांसाठी महत्त्वाचे पुरावे ठरले आहेत. या व्हिडिओंमध्ये आरोपी पत्नी प्रियंकाचे उग्र आणि हिंसक वर्तन स्पष्टपणे दिसत असून, ती आपल्या पतीला किती मानसिक त्रास देत होती याचे विदारक वास्तव समोर आले आहे. एका व्हिडिओमध्ये देवकृष्ण पत्नीला तिच्या फोन कॉल्सबद्दल विचारत असताना ती त्याच्यावर वाईट रीतीने भडकल्याचे दिसते, ज्यामुळे या नात्यातील तणाव उघड झाला आहे.

अनैतिक संबंध आणि पतीला मिळालेली अमानवीय वागणूक

या धक्कादायक व्हिडिओंमध्ये आणखी एक वेदनादायक बाब म्हणजे खोलीत दिसणारे दोन वेगवेगळे पलंग. नातेवाईकांचा असा दावा आहे की प्रियांकाने देवकृष्णला मानसिकदृष्ट्या इतके छळले केले होते की ते दोघे पती-पत्नीसारखे राहत नसत. देवकृष्णला अनेकदा जमिनीवर झोपायला भाग पाडले जात असे, ज्यामुळे तो स्वतःच्या घरातच परक्यासारखा राहत होता. जेव्हा ज्योतीने प्रियंकाच्या या वर्तनाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रियंकाने केवळ विरोधच केला नाही तर झडप घालून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. प्रियंकाला आपले गुपित उघड होण्याची भीती होती हे यातून स्पष्ट होते. नातेवाईकांच्या मते, लग्नानंतर प्रियंकाचे वागणे नेहमीच संशयास्पद होते. तिचे वर्ष 2020 पासून एका व्यक्तीशी प्रेमसंबंध सुरू होते आणि याच कारणामुळे तिचे सासरच्या घरी मन लागत नसे. ती आपला जास्तीत जास्त वेळ माहेरीच घालवत असे आणि जेव्हा गोंदीखेड्यात येत असे, तेव्हा घरात सतत वादाचे आणि क्लेशाचे वातावरण निर्माण करत असे. ती देवकृष्णचा अपमान करून त्याला घटस्फोटासाठी सतत दबाव टाकत होती.

हेही वाचा : नागपूर: हुंड्याच्या छळाला कंटाळून पीडितेनं ब्लँकेटनं गळफास घेत संपवलं जीवन; सासरच्यांकडून सुनेचा हुंडाबळी

7 एप्रिलची काळरात्र आणि पोलिसांचा मोठा खुलासा

7 एप्रिलच्या त्या काळरात्री देवकृष्णची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केल्यावर सर्व संशयाची सुई प्रियंका आणि तिचा प्रियकर कमलेश यांच्याकडे वळली. पोलीस तपासात असा खुलासा झाला आहे की या भीषण हत्याकांडात प्रियंका, तिचा प्रियकर कमलेश आणि एक अन्य साथीदार सुरेंद्र भाटी यांचा समावेश होता. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत प्रियंका आणि कमलेश यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी 13 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. या कटातील तिसरा आरोपी सुरेंद्र भाटी हा सध्या फरार असून पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून त्याचा शोध घेत आहेत. प्रियंकाला आपल्या प्रियकरासोबत नवीन आयुष्य सुरू करायचे होते आणि यामध्ये देवकृष्ण हा सर्वात मोठा अडथळा ठरत होता, म्हणूनच ही हत्या घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. प्रियंका देवकृष्णला नेहमी "तू माझ्या लायकीचा नाहीस" असे म्हणून अपमानित करत असे.

हे वाचलं का?