राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूला ताटकळत ठेवल्याची चर्चा, आता राज ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई तक

• 01:09 PM • 07 Aug 2026

राज ठाकरे यांची दीड तास वाट पाहूनही भेट न झाल्याने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते दिलीप गावित यांना माघारी फिरावे लागले होते. या घटनेनंतर राजकीय आणि क्रीडा वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. या संपूर्ण प्रकरणावर अखेर राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Raj Thackeray On Dilip Gavit

Raj Thackeray On Dilip Gavit

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूला ताटकळत ठेवल्याची चर्चा

point

आता राज ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण

point

नाशिकमधील पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

Raj Thackeray On Dilip Gavit : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा पॅराअथलीट दिलीप गावित आणि त्याचे प्रशिक्षक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. मात्र, तब्बल दीड तास वाट पाहूनही भेट न झाल्याने त्यांना माघारी फिरावे लागले होते. या घटनेनंतर राजकीय आणि क्रीडा वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. या संपूर्ण प्रकरणावर अखेर राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये बोलताना आपली भूमिका स्पष्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

'मी दिलगिरी व्यक्त करतो'

माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, 'राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडू काल मला नाशिकमध्ये भेटायला आले, माझी आणि त्यांची भेट झाली नाही अशा बातम्या मी पाहिल्या. मुळात श्री. गावित हे मला भेटायला आलेत हेच मला माहित नव्हतं, मला कोणी सांगितलं नाही. त्यामुळे भेट झाली नाही. बाकी ते जर भेटायला आलेत असं कळलं असतं तर भेट नक्की झाली असती. मी का भेटणार नाही? पण त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. पण या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सध्या ते दिल्लीला गेलेत असं कळलं, ते तिकडून आले की मी निश्चितपणे त्यांची भेट घेईन.'

हे ही वाचा : BJP महिला नेत्यांबाबत आक्षेपार्ह बोलला, भाजपच्या नेत्याला अटक

कोण आहेत दिलीप गावित?

दिलीप गावित हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यातील आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी पुरुषांच्या 100 मीटर टी-47 अंतिम शर्यतीत सुवर्ण पदक पटकावले. हलाखीच्या परिस्थितीवर मात करत गावित यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली. यामुळे त्यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत गावित यांचे अभिनंदन केले.

हे ही वाचा : शिंदेंवर नाही तसली टीका, प्रेसनंतर लगेच जरांगेंना फोन, जे जे बोलले ते सगळं ऐका!

'सगळ्याची वाट लागली आहे'

माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी नाशिकमधील वृक्षतोडीविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, 'मला वाईट वाटतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात आम्ही नाशिक शहर इतकं सुंदर केलं, इतके चांगले रस्ते बांधले, त्या सगळ्याची पार वाट लागली आहे. बोटॅनिकल गार्डन असेल की माननीय बाळासाहेबांच्या नावाने उभारलेलं स्मारक असेल सगळ्याची पार वाट लावून टाकली आहे. दुसऱ्यांनी केलं मग ते का टिकवायचं, ही कुठली वृत्ती ? नाशिकमध्ये झाडं तोडली गेली, लोकांनी आंदोलनं केली, प्रशासन ढिम्म राहिलं, तरीही नाशिककर जर त्याच लोकांना निवडून देणार असतील तर काय बोलायचं?'