सतीश सालीयान मातोश्रीच्या बाहेर, ठाकरेंना नोटीस देत काय बोलून गेले?

मुंबई तक

20 Sep 2026 (अपडेटेड: 20 Sep 2026, 09:28 AM)

Disha Salian case : दिशा सालीयन प्रकरणात सतीश सालीयन मातोश्रीबाहेर पोहोचले. उद्धव ठाकरे यांना नोटीस देत 500 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं.

Disha Salian case

Disha Salian case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सतीश सालीयान मातोश्रीच्या बाहेर

point

ठाकरेंना नोटीस देत काय बोलून गेले?

Disha Salian Case : मुंबईतील दिशा सालीयन प्रकरणात नवी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला असून प्रकरणाची नव्याने चौकशी केली जाणार आहे. अशातच दिशा सालीयन यांचे वडील सतीश सालीयन हे आज उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर पोहोचले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना नोटीस देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी या प्रकरणावरून काही मागण्या केल्याचं सांगितलं.

हे वाचलं का?

नोटीसमध्ये 500 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा डीडी देण्याची मागणी

सतीश सालीयन यांनी नोटीस दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. नोटीसमध्ये माफी मागण्याची आणि 500 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा डीडी देण्याची मागणी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच या प्रकरणात  राजकीय हेतूने आरोप केले जात असल्याचा दावा त्यांनी फेटाळला. आपला कोणत्याही राजकारणाशी संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटलं. आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा आधार काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दिशा सालीयन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

यापूर्वी दिशा सालीयन प्रकरणावरून भाजप नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सतीश सालीयन यांनी याच पार्श्वभूमीवर मातोश्रीबाहेर येत नोटीस देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला धमकी देण्यात आली होती आणि आपल्याला प्रॅक्टिस करू देणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं, असा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे आपण कोणालाही न घाबरता मातोश्रीबाहेर आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणात आपली भूमिका राजकीय हेतूने प्रेरित नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

नोटीस स्वीकारण्यात आल्यानंतर सतीश सालीयन यांनी पुढील भूमिका सोमवारी स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं. सहकार्य न झाल्यास पुढे काय भूमिका घ्यायची, हे सोमवारी सांगणार असल्याचं त्यांनी म्हटलं. दिशा सालीयन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड झाली आहे. त्यामुळे या प्रकरणावरून पुन्हा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.