आदित्य ठाकरेंना थेट 500 कोटींची मानहानीची नोटीस, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

18 Sep 2026 (अपडेटेड: 18 Sep 2026, 10:20 AM)

Aaditya Thackeray Satish salian 500 crore defamation notice : दिशा सालियान प्रकरणात सतीश सालियान यांच्याकडून आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांना 500 कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. नोटिशीत आठ प्रमुख मागण्या करण्यात आल्या असून सात दिवसांत उत्तर देण्याची मुदत देण्यात आली आहे.

Aaditya Thackeray Satish salian 500 crore defamation notice

Aaditya Thackeray Satish salian 500 crore defamation notice

Google CTA

बातम्या हायलाइट

point

Satish Salian यांच्याकडून 500 कोटींची नोटीस, 8 मागण्या कुठल्या? | Disha Salian

point

नोटिशीत दोघांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेत नुकसानभरपाई आणि सार्वजनिक माफीची मागणी

Aaditya thackeray satish salian 500 crore defamation notice : दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणात सतीश सालियान यांच्याकडून आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांना 500 कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्याची कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. 16 सप्टेंबर 2026 रोजी सतीश सालियान यांच्या वकिलांकडून ही नोटीस पाठवण्यात आली. या नोटिशीत सतीश सालियान यांच्या प्रतिमा, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हतेला कथित धक्का पोहोचल्याचा दावा करण्यात आला असून, आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी माफी मागावी. कथित आरोप मागे घ्यावेत आणि 500 कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा : Personal Finance: घरातील एकाच व्यक्तीला सगळे आर्थिक व्यवहार माहीत असणं योग्य की अयोग्य?

नेमकं प्रकरण काय आहे?

या प्रकरणाची पार्श्वभूमी 2 सप्टेंबर 2026 रोजीच्या मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीशी जोडण्यात आली आहे. सतीश सालियान यांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात स्वतंत्र तपासाची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने तपास सीबीआयकडे वर्ग केल्यानंतर सतीश सालियान यांचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आली.

या एफआयआरमध्ये सामूहिक बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणे किंवा दडपणे तसेच विविध व्यक्तींच्या सहभागाच्या आरोपांचा तपास करण्याचा उल्लेख आहे. मात्र, एफआयआरमध्ये कोणालाही आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. सतीश सालियान यांच्या जबाबात आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अनिल देशमुख आणि काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांचा या प्रकरणातील कथित सहभाग आणि भूमिका तपासावी, अशी मागणी सतीश सालियान यांनी केल्याचे सांगण्यात आले आहे. 

हेही वाचा : 15 ऑक्टोबरपासून दुकानदार UPI पेमेंटसाठी अतिरिक्त पैसे घेऊ शकतात? तुमच्या मनातील 7 प्रश्नांची उत्तरे

आदित्य ठाकरेंनी दिशा सालियान केसबद्दल काय म्हटलं होतं.?

2 सप्टेंबरच्या सुनावणीदरम्यान आदित्य ठाकरे यांच्या बाजूने सतीश सालियान यांची याचिका राजकीय हेतूने प्रेरित आणि त्यांची प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने असल्याचे आरोप करण्यात आले. तसेच सतीश सालियान यांचा वापर आदित्य ठाकरे यांना त्रास देण्यासाठी केला जात असल्याचा युक्तिवाद झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. सीबीआयने आदित्य ठाकरेंना क्लीन चिट दिल्याचा दावा चुकीचा असल्याचे सतीश सालियान यांच्या बाजूने सांगण्यात आले आहे. सीबीआयने या प्रकरणाचा तपास केलेला नसल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या वक्तव्याचाही उल्लेख नोटिशीत करण्यात आला आहे. 23 मार्च 2025 रोजी देशमुख यांनी हे प्रकरण आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी सुरू असलेले कारस्थान असल्याचे म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे सतीश सालियान हे मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारे वडील नसून आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याच्या कटाचा भाग असल्याचे चित्र निर्माण झाल्याचा आरोप नोटिशीत करण्यात आला आहे. तसेच माध्यमांमध्ये काही बाबी निवडक पद्धतीने प्रसिद्ध झाल्यामुळे सतीश सालियान यांच्या सार्वजनिक प्रतिमेला, प्रतिष्ठेला आणि विश्वासार्हतेला कथित धक्का बसल्याचेही नोटिशीत म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर सतीश सालियान यांनी आठ मागण्या केल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी बिनशर्त आणि स्पष्ट सार्वजनिक माफी मागावी, कथित आरोप मागे घ्यावेत, ही माफी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील प्रिंट, टीव्ही, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावी, अशी मागणी आहे. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर ठळकपणे माफी प्रसिद्ध करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर किमान तीन मिनिटांचा बिनशर्त माफीनामा प्रसारित करावा, तसेच तोच व्हिडिओ दोघांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर आणि संबंधित डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करावा, अशीही मागणी आहे. कथित आरोप मागे घेऊन सीबीआय तपास आणि आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाल्याबाबतचे कथित कथन दुरुस्त करावे, तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर आणि सीबीआय तपास सुरू असल्याचे मान्य करावे, अशी मागणी नोटिशीत करण्यात आली आहे. प्रसिद्ध केलेली माफी किंवा स्पष्टीकरण नंतर हटवू नये, अशी अटही ठेवण्यात आली आहे.