".. तर हे सरकार पडू शकतं", प्रकृती चिंताजनक तरीही जरांगे फायर

मुंबई तक

16 Sep 2026 (अपडेटेड: 16 Sep 2026, 07:42 PM)

Manoj Jarange Patil : "मी मुंबईला जाणार आहे इथं थांबाणार नाही, काल पोटात मला त्रास झाला होता. आज सलाईन लावल्याने मला हलता आले नाही, पण मी उद्या 17 सप्टेंबर रोजी मुंबईकडे जाणार आहे. मेलो तरीही मी मागे हटणार नाही. मराठा समाजावर लाठीचार्ज झाल्यानंतर सरकार पडू शकतं," असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला.

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक 

point

"मी मुंबईला जाणार आहे इथं थांबाणार नाही"

Manoj Jarange Patil : "मी मुंबईला जाणार आहे इथं थांबाणार नाही, काल पोटात मला त्रास झाला होता. आज सलाईन लावल्याने मला हलता आले नाही, पण मी उद्या 17 सप्टेंबर रोजी मुंबईकडे जाणार आहे. मेलो तरीही मी मागे हटणार नाही. दुसरा विषय असाय की, महाराष्ट्रात थांबलेला काही मराठा समाज यांना मुंबईत कधी बोलवायचे हे मी सांगणार होतो, मात्र सरकारने त्यासंबंधित ड्राफ्ट पाठवलेला आहे. अशा परिस्थिती जर सरकारने मराठा समाजावर आंदोलनादरम्यान लाठीजार्च केल्यास सरकार देखील पडू शकतं," असे मनोज जरांगे यांनी एक प्रकारे इशाराच दिलाय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'आम्हाला सविस्तर माहिती द्या..', मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांची नोटीस, नेमकं काय घडलं?

मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक 

पुढे ते म्हणाले की, "मला उठता बसता येत नाहीये. पोटात, हातात-पायात आग होतेय. मला आज उठता नाही आलं, ज्या मार्गावर जायचे होते तिथे जाता आलं नाही, मी उद्या दुपारी 1 वाजल्यानंतर निघणार आहे. माझं सरकारविरोधात डोकं चिडलेलं आहे. मला सरकार आझाद मैदानावर जाऊ देत नाहीयेत, मी मराठा बांधवांना बोलावेन," असं म्हणत त्यांनी थेट राज्य सरकारला ओपन चॅलेंज दिलंय. 

"..तर सरकार पडणार?" 

नंतर ते म्हणाले की, "मराठा समाजावर लाठीचार्ज केल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळल्यास हे सरकार पडू शकतं. यावेळी महिलांचा देखील समावेश असणार आहे. लाख नसून कोटींच्या घरात मराठा बांधव येणार आहेत. काही मराठा बांधव हे माझ्या शब्दामुळे थांबले आहेत, तर काहीजण आले आहेत. काही मराठा बांधव आलेत त्यांना पुन्हा जाण्यास सांगणार आहे. मी जेव्हा तारीख सांगेन तेव्हाच मराठा बांधवांना बोलावणार, जोपर्यंत बोलावत नाही तोपर्यंत, गाव, जिल्हा, तालुका सांभाळा", असं मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. 

हे ही वाचा : Shiv Sena सुनावणी : ठाकरेंच्या अधिकारांवरच बोट, शिंदेंच्या युक्तिवादाने नवं वळण? LIVE अपडेट

पुढे ते म्हणाले की, "मुख्यमंत्री नुसते बोलतात, प्रश्न सोडवा, आज उपोषणाला 19 दिवस झालेत. महाराष्ट्रातील मराठा समाजाची राख झाल्यावर आरक्षण देणार का? माणसं मेल्यावर? महाराष्ट्र अख्खा उद्ध्वस्त झाल्यानंतरच आरक्षण देणार का? सलाईन लावल्यामुळे मला बोलता येतंय," असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.  

त्यानंतर त्यांनी सरकारला विनंती करत सांगितलं की, "मीडियाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, हैदराबादचा जीआर सुधारित करून द्या. मंत्र्यांना बोला आणि जीआर सुधारित करून द्या, तसेच प्रमाणपत्र आणि रेकॉर्ड शोधायला सुरुवात करावी," अशी जरांगेचीं मागणी आहे. नंतर त्यांनी सांगितलं की, "सरकारने एक ड्राफ्ट अंतरवालीच्या सरपंचांना पाठवला आहे. सरकारचं एक शिष्टमंडळ आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी जरांगेना भेटायला येण्याची शक्यता आहे. सरकारच्या शिष्टमंडळमध्ये कोण आहे याची माहिती मिळू शकली नाही", असं जरांगेंनी सांगितलं.