कल्याण : पतीसोबतचा वाद मिटवतो, बहाणा करुन बोलावलं अन् भाजप नेत्याकडून अत्याचार

मिथिलेश गुप्ता

17 Sep 2026 (अपडेटेड: 17 Sep 2026, 02:13 PM)

Kalayan Crime News : कल्याण शहरात मन सुन्न करून टाकणारा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 22 वर्षीय विवाहित महिलेचे तिच्या पतीसोबत सतत वाद होत असे. याच वादाचा नेमका तोडगा काढण्याच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदाराने कार्यालयात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

Kalayan crime news

Kalayan crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भाजपच्या माजी आमदारावर लैंगिक अत्याचाराचा आरोप

point

काँग्रेस नगरसेविकेकडे पीडितेची तक्रार 

Kalayan Crime News : कल्याण शहरात मन सुन्न करून टाकणारा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 22 वर्षीय विवाहित महिलेचे तिच्या पतीसोबत सतत वाद होत असे. याच वादाचा नेमका तोडगा काढण्याच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदाराने कार्यालयात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. माजी आमदाराची नरेंद्र पाटील अशी ओळख समोर आली. आरोपी एवढ्यावरच न थांबता शस्त्राचा धाक दाखवून तिला दारू देखील पाजल्याचा पीडितेनं आरोप केला. या घटनेनं शहर हादरून गेले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : डोंबिवलीत चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, 85 वर्षीय नराधमाला बेड्या

नेमकं काय घडलं?  

पीडितेनं केलेल्या तक्रारीनुसार, तिच्या पतीचे सतत तिच्यासोबत वाद असायचे. या वादात मध्यस्ती करण्याच्या बहाण्याने नरेंद्र पवार यांनी भिवंडीतील कार्यालयात बोलावले होते. नंतर 13 सप्टेंबर रोजी नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांनी तिला तालुक्यातील बापगाव येथील फार्महाऊसवर नेत शस्त्राचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला. तसेच दारू देखील पाजल्याचा पीडितेनं आरोप केला आहे. 

पीडितेच्या माहितीनुसार, रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास नरेंद्र हे घटनास्थळावरून पळून गेले होते. नंतर शैलेश पाटील यांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास शैलेश पाटील यांच्या घरातील केअरटेकने पीडितेला तिच्या घरी आणून सोडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

काँग्रेस नगरसेविकेकडे केली तक्रार 

संबंधित प्रकरणात पीडित महिलेनं काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याकडे मदतीची हाक मारली आहे. पीडितेनं कथित घडलेल्या घटनेचा संबंधित व्हिडिओ त्याचप्रमाणे  मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅटही दाखविल्याचे कांचन कुलकर्णी यांनी सांगितले. कांचन कुलकर्णी या पीडित तरुणीला सोबत घेऊन रात्री पडघा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. कांचन कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याशीही रात्री संपर्क साधला. त्यानंतर पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हे ही वाचा : फार्महाऊसवर नेऊन सामुहिक अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप, माजी आमदारासह दोघांवर गुन्हा दाखल

पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिर यांनी प्रकरणाची दखल घेत सामूहिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून नरेंद्र पवार आणि शैलेश पाटीलविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, पीडित तरुणीने पोलिसांकडे न्यायाची मागणी करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.