मुंबई: बाजारात येणाऱ्या नवनवीन अश्लील App वर कठोर कारवाई करावी अशी मागणी पुन्हा एकदा भाजप आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. विधानपरिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. याआधी त्यांनी ULLU अॅपवर बंदी आणावी अशी मागणी केली होती. तशीच मागणी आता त्यांनी पुन्हा एकदा Masti, Atrangii आणि तत्सम अॅप आणि ऑनलाइन गेमिंगबाबत केली आहे.
ADVERTISEMENT
पाहा विधानपरिषदेत चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या..
डिजिटल युगात मोबाइल असेल, इंटरनेट असेल आणि ऑनलाइन गेमिंग हे मुलांच्या जीवनाचा भाग झाले आहेत. लहान मुलांना मोबाइल पाहण्याचं व्यसन लागलं आहे. नकळतपणे आपलं पालकत्व त्या मोबाइलला पालकांनी बहाल केलंय. ही बाब अत्यंत गंभीर आहे. आपली मुलं गेमिंगच्या दुनियेत हरवतात. ते हरवतात तेव्हा त्यांच्यासमोर काय येतं हे पालकांना माहितीए का?
हे ही वाचा>> 'अजितकाका.. तोपर्यंत मी बटण असंच उघडं ठेवणार', रोहित पवार विधानसभेत ढसाढसा रडले अन्..
गेम खेळताना मुलांना meet new people, dating app, लाइव्ह पॉर्न व्हिडिओ दिसतात. टिंडर, बम्बल किंवा इतर व्हिडिओ चॅट प्रकारच्या सेवा आकर्षण आणि कुतूहल या मुलांच्या मनात निर्माण करतात. मुलांना कुठल्या तरी बाह्य लिंकवर नेतात आणि सुरू होतो मुलांच्या भविष्याशी अतिशय जीवघेणा खेळ.
गेम, चॅट.. अनोळखी व्यक्ती संपर्क करते, टीममध्ये सामील करून घेतात विश्वास जिंकतात.. डिसकॉर्ड आणि टेलिग्राम यासारख्या प्लॅटफॉर्मवर नेऊन या मुलांची वैयक्तिक माहिती विचारली जाते. ही अत्यंत धोकादायक अशी प्रक्रिया आहे.
एवढंच नाही दहशतवादी संघटना, कट्टरपंथी लोक हे लोकप्रिय गेमिंग अॅपचा वापर वय वर्ष 11 ते 17 पर्यंतच्या मुलांपर्यंत दहशतवादी, गुन्हेगारी विचार पोहचविण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्या समोर आलं आहे.
हे ही वाचा>> बीड : जय महाराष्ट्र.., शेवटचा क्षण; व्हाट्सअॅप स्टेटस ठेवत शिंदेंच्या उपतालुका प्रमुखाचं टोकांचं पाऊल, प्रकृती चिंताजनक
ब्ल्यू व्हेल चॅलेंज सारख्या ऑनलाइन प्रभावामुळे विविध राज्यांमध्ये मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. या गेमिंग प्लॅटफॉर्मवर मुलांकडून पैसे उकळले जातात किंवा ब्लॅकमेल केलं जातं.
मागच्या वेळेला उल्लू अॅप आणि असले घाणेरडे अॅप्स अशा 25 काही अॅप्सवर बंदी आली. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या मदतीने ही बंदी आणली मी तशी मागणी केली होती. पण अजूनही Masti, Atrangi Movie भरीस भर म्हणून सेक्स अॅक्शन प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत.
याचा काय परिणाम होतो हे आपण पाहिलं आहे. छ. संभाजीनगरमध्ये 11 वर्षाच्या मुलावर इतर मुलांकडून लैंगिक अत्याचार झाला. इतकी भयानक घटना घडलीय.
पोर्नोग्राफी आणि अयोग्य अॅप आणि संकेतस्थळांवर बंदी आणावी. कायम मॉनिटरिंग आणि ऑडिट झालं पाहिजे ही माझी मागणी आहे. असं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.
ADVERTISEMENT











