PIL On Ajit Pawar Death : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी यासाठी रोहित पवारांनी रान उठवले आहे; तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. माहिती आधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. 28 जानेवारी रोजी बारामतीत अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृ्त्यू झाला होता. त्यानंतर या अपघातामागे घातपात असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत नेमक्या काय मागण्या करण्यात आल्या आहेत, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'Masti, Atrangii असले App...', चित्रा वाघांनी सभागृहात पुन्हा केली 'ही' मागणी
याचिकेतील प्रमुख मागण्या काय?
अजित पवार यांच्या विअमान अपघातानंतर घातपाताच्या शक्यता वर्तवण्यात आल्या. त्याच अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यामधील पहिली मागणी अशी आहे की, अजित पवार यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी राज्यातील सीआयडीमार्फत एसआयटी नेमण्यात यावी. दुसरी मुख्य मागणी अशी आहे की, या अपघाताची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत न्यायालयीन चौकशी व्हावी. या समितीत डीजीसीएचे निवृत्त अधिकारी आणि हवाई तज्ज्ञांचा समावेश असावा. या मागण्या करणारी जनहित याचिका केतन तिरोडकर यांनी दाखल केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून ई-मेलला प्रतिसाद न मिळाल्याने याचिका
अजित पवार यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी याचिका दाखल केल्यानंतर केतन तिरोडकर यांनी सांगितले की, 'अजित पवारांच्या निधानानंतर बरेचसे प्रश्न उपस्थित झाले आहेत. मी डिजीसीएला बरेचसे आरटीआय पाठवले. सीएम ऑफिसला पाठवले. व्हीएसआर कंपनीच्या डायरेक्टरचा मुलगा रोहित सिंग भारत सोडून गेला आहे का? अजित पवारांच्या ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानाला उड्डाणाची परवानगी होती का? बारामती विमानतळावर उतरताना पर्यायी रनवेसाठी किती वायरलेस मेसेजेस पाठवण्यात आले?' असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
यापुढं बोलताना ते म्हणाले की, 'अजित पवार मुंबईहून पुण्याला बायरोड येणार होते. 27 जानेवारीला पुण्यात मुक्काम करुन 28 जानेवारीला ते बायरोड बारामतीला जाणार होते. पण कोणत्या मंत्र्याच्या किंवा खासदाराच्या फोनवरुन ते फाईलवर सही करण्यासाठी मुंबईत थांबले. यानंतर त्यांनी किती वाजता विमान बुक केले? कोणाच्या नावाने बुक केले? या प्रश्नांची उत्तरे डीजीसीए आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून आलेले नाहीत. सीआयडीकडून या अपघाताची चौकशी व्हावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांना ईमेल केला होता, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.'
हे ही वाचा : पुणे : विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहन चालकासोबत रुपाली पाटील ठोंबरेंचा मोठा वाद, शाब्दिक चकमक; व्हिडीओ व्हायरल
रोहित पवार प्रतिवादी
अजित पवार यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत रोहित पवार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. रोहित पवार यांच्याकडे अपघातासंदर्भात असलेली सर्व माहिती चौकशी आयोगापुढे सादर करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी देखील या जनहित याचिकते दाखल करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











