Abhijeet Dipke, छत्रपती संभाजीनगर : "आमची लढाई राजकीयच असेल. भारतातील प्रत्येकाने पॉलिटिकल असायला हवं. आपल्या देशात मी राजकारणाशी संबंध नसलेला आहे, असं अभिमानाने सांगितलं जातं. यात अभिमानाची काय गोष्ट आहे? तुमच्या घरात टूथपेस्ट आणता, त्यावर देखील टॅक्स लागतो. ते सुद्धा पॉलिटिकल असतो. आम आदमी पार्टी सोडली कारण मला बाहेर जायचं होतं. पैसा तेवढा मिळत नव्हता. माझं 30 हजारात कसं घर चालणार? उद्या जाऊन आई-वडिलांना सांभाळायचं आहे. अमेरिकेत जाऊन सेटल व्हायचा प्लॅन होता. तिथे कमवून घराच्यांनाही तिकडं नेता येईल, असा विचार होता", असं कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके म्हणाले. ते 'मुंबई Tak' ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'भाजपमध्ये ये अन्यथा काही करुन टाकू', ऑफर, धमक्या, पहिल्यांदा गौप्यस्फोट
'सरकारी अधिकारी सामान्यांशी कसे बोलतात?'
यावेळी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, अमेरिकेत बेटर लाईफ मिळेल असा विचार होता. इकडं हवा चांगली नाही, पाणी चांगलं नाही. तक्रार करायला गेलो तर सरकारी अधिकारी कसे बोलतात? हे आपल्याला माहिती आहे. आमदार-खासदाराचा मुलगा गेला तर दादा-दादा, भाऊ-भाऊ करतील.. आम्ही गेलो की, म्हणतील सरक ..त्या खिडकीवर जा.. आपल्या देशात डिग्निटी नाही.
हेही वाचा : Maharashtra weather : राज्यात 'या' जिल्ह्यांत वरुणराजाचा हाहाकार, IMD चा मोठा अलर्ट
'आंदोलकांना थकवायचं, ही सरकारची स्ट्रॅटर्जी होती'
पुढे बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, पोलिसांनी दगडांनी भरलेला ट्रक जंतर-मंतरजवळ आणून ठेवला होता. मीडियात आंदोलकांनी दगडफेक केली, असं चालवलं जाणार हे समजत होतं. दिल्ली पोलिसांनी स्वत:साठी ते दगड आणून ठेवले होते. माझाच देश मला नॅशनल सेक्युरेटी थ्रेट म्हणत होता. मी जर अमेरिकेतच राहिले असतो तर आयुष्यभरासाठी ठपका राहिला असता. त्यामुळे भारतात जायचं ठरवलं होतं. सुरुवातीला आंदोलनाला 200 लोकं आले होते. ते माझ्यासाठी महत्त्वपूर्ण होते. सुरुवातीला त्या लोकांनी हिंमत दाखवली नसती, तर एवढं मोठं आंदोलन झालं नसतं. आंदोलकांना थकवायचं, ही सरकारची स्ट्रॅटर्जी होती. आमच्या वॉशरुमचे पाईप (पाणी) बंद करण्यात आले होते. लाठीचार्ज करण्याऐवजी त्यांना हा मार्ग स्वीकारायचा होता. 20 तारखेला एवढे लोकं येतील, याचा आम्हालाही अंदाज नव्हता. मात्र, लोकं जास्त येतात, हे समजल्यानंतर सरकार बॅकफुटवर गेलं, असंही दिपकेंनी सांगितलं.
12-12 वर्षांच्या मुलींची गळे पकडले. त्यांना कपडे फाडून मारलं. प्रायव्हेट पार्टवर काठ्यांचा वापर केला गेला. दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशाने काम करतात. त्यांना कल्पना नव्हती, असं सरकारचं मत आहे. तर त्यांच्या सरकारवर कसा विश्वास ठेवायचा? विद्यार्थ्यांवर पैलेट गनचा वापर केला. त्यांच्यावर एके 47 चालवत आहेत. अमित शाहांनी क्रूरता दाखवली आहे. लाठीचार्ज केला तर काठ्यांना खिळे लावले होते. विद्यार्थ्यांना आंतकवाद्यांसारखी वागणूक देण्यात आली, असंही अभिजीत दिपके यांनी नमूद केलं.
ADVERTISEMENT












