टेलिग्रामच्या संस्थापकावर दहशतवादी कारवाया केल्याचे आरोप, अटक वॉरंट जारी

मुंबई तक

30 Jul 2026 (अपडेटेड: 30 Jul 2026, 11:21 AM)

russia fsb charges telegram founder pavel durov terrorism : रशियाने टेलिग्रामचे संस्थापक पावेल डुरोव्ह यांच्यावर दहशतवादी कारवायांना मदत केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी एफएसबीने त्यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंटही जारी केल्याचा दावा केला आहे.

russia fsb charges telegram founder pavel durov terrorism

russia fsb charges telegram founder pavel durov terrorism

Google CTA

बातम्या हायलाइट

point

टेलिग्रामचे संस्थापक पावेल डुरोव्ह अडचणीत

point

डुरोव्ह अडचीत यांच्यावर दहशतवादी कारवाया केल्याचे आरोप

point

अटक वॉरंट जारी

russia fsb charges telegram founder pavel durov terrorism : रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (एफएसबी)ने बुधवारी टेलिग्रामचे संस्थापक पावेल डुरोव्ह यांच्याविरोधात दहशतवादी कारवायांना मदत केल्याचा गंभीर आरोप दाखल केला आहे. एफएसबीच्या म्हणण्यानुसार, टेलिग्रामला रशियामधील विध्वंसक कारवाया, दहशतवादी हल्ले आणि सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कथित कंटेटवर कारवाई करण्यात अपयश आले. या प्रकरणात एफएसबीने दुरोव यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंटही जारी केल्याचा दावा केला आहे. मात्र, या आरोपांवर पावेल डुरोव्ह किंवा टेलिग्रामकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'आईने आत्महत्या केली नाही...' मुली पाच वर्ष लढल्या; अखेर भयानक सत्य समोर

कंटेट हटवण्यात टेलिग्राम अपयशी

एफएसबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टेलिग्रामवर असा कंटेट उपलब्ध होता, जो कथितरित्या युक्रेनच्या विशेष सुरक्षा यंत्रणा तसेच दहशतवादी आणि अतिरेकी संघटनांकडून वापरला जात होता. या माध्यमातून रशियन महासंघामध्ये विध्वंसक कारवाया, दहशतवादी हल्ले, सामूहिक हत्याकांड आणि सायबर फसवणुकीच्या कारवायांचे नियोजन व समन्वय करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. एफएसबीच्या मते, अशा प्रकारचा कंटेट हटवण्यात टेलिग्राम अपयशी ठरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा : Personal Finance: EMI भरत आहात? ही 'एक चूक' तुम्हाला पडू शकते 15 लाखांनी महाग!

कधी झाली होती टेलिग्रामची स्थापना? 

पावेल डुरोव्ह यांनी 2013 मध्ये टेलिग्रामची स्थापना केली होती. एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह सुरक्षित संवादासाठी ओळखले जाणारे हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म जगभरात एक अब्जाहून अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचल्याचा दावा कंपनीने केला आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून रशियाने टेलिग्रामचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला असून, त्याचवेळी सरकारच्या पाठबळ असलेल्या MAX या मेसेजिंग सेवेला पर्याय म्हणून प्रोत्साहन दिले जात आहे.

रशियात जन्मलेले पावेल डुरोव्ह सध्या संयुक्त अरब अमिराती आणि फ्रान्सचे नागरिक आहेत. त्यांनी यापूर्वी रशियातील लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म VKontakte ची स्थापना केली होती. रशियन अधिकाऱ्यांचा वाढता दबाव लक्षात घेऊन 2014 मध्ये त्यांनी या कंपनीतील उर्वरित हिस्सा विकला होता. दरम्यान, दुरोव यांच्यावर फ्रान्समध्येही चौकशी सुरू आहे. फ्रेंच अधिकाऱ्यांचा आरोप आहे की, टेलिग्रामने प्लॅटफॉर्मवरील कथित गुन्हेगारी कारवायांवर पुरेशी नियंत्रणात्मक पावले उचलली नाहीत आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांशी आवश्यक ते सहकार्य केले नाही. मात्र, दुरोव यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.