धक्कादायक... आमदार निवासाच्या इमारतीवरून पडून भाजपच्या माजी मंत्र्याचा मृत्यू

मुंबई तक

• 07:18 PM • 28 Jul 2026

उत्तर प्रदेशचे माजी राज्यमंत्री आणि भाजप नेते नानक राम भुरजी यांचा लखनौमधील आमदार निवासस्थान संकुलातील इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

bjp leader and former minister nanak ram bhurji  dies after falling from mla residence building in lucknow

भाजपच्या माजी मंत्र्याचा मृत्यू (प्रातिनिधिक फोटो)

Google CTA

लखनौ: उत्तर प्रदेशचे माजी राज्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नानक राम भुरजी यांचा मंगळवारी (28 जुलै) अत्यंत विचित्र पद्धतीने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखनौच्या हजरतगंजमधील आमदार निवास संकुलातील एका उंच इमारतीवरून पडून नानक राम भुरजी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे वाचलं का?

68 वर्षीय भाजप नेते नानक राम भुरजी हे दारुलशफा येथील नवीन आमदार वसतिगृहाच्या उंच इमारतीवरून पडले. दरम्यान, पोलिसांनी त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मानसिक ताण आणि दीर्घकालीन आजार

पोलिसांच्या तपासातील प्राथमिक निष्कर्ष खूपच चिंताजनक आहेत. असे वृत्त आहे की, माजी मंत्री नानक राम भुरजी हे मागील काही काळापासून तीव्र नैराश्याने ग्रस्त होते. दारुलशफा कॅम्पसमध्ये उपस्थित असलेल्या लोकांच्या आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते गेल्या काही दिवसांपासून आमदार निवासाजवळ एकटेच फिरताना दिसायचे.

हे ही वाचा>> बायकोचे अफेयर असल्याचा पतीला संशय, पंख्याला लटकवून मारलं

जेव्हा आमदार निवासाच्या प्रभारींनी स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली, तेव्हा एकच गोंधळ उडाला. पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि रक्ताने माखलेल्या नानक राम भुरजी यांना रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांचे प्राण वाचवता आले नाही.

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या समर्थकांना आणि भाजप कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली.

हे ही वाचा>> 'आज मी कलंक पुसला...' ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या पत्नीची हत्या, पती का झाला क्रूर?

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दुर्दैवाने तोल गेल्यामुळे नानक भुरजी हे पडले की त्यांनी नैराश्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, हे निश्चित करण्यासाठी पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या संपूर्ण घटनेचे खरे कारण समोर येईल.