Rahul gandhi : दिल्लीत विद्यार्थ्यांच्या झालेल्या आंदोलनानंतर आता बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर स्थानिक पोलिसांनी गोळीबार केल्याचा आरोप काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करत या घटनेच्या माहितीला दुजोरा दिलेला आहे. शेकडो विद्यार्थ्यांना अटक केल्याचं सांगत मोदींजींनी दिलेल्या आश्वासनावर प्रश्न उपस्थित केलेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पेपर फोडणाऱ्यांना चाप लावण्यासाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल, परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत सादर
राहुल गांधी यांचं जसंच्या तसं ट्विट
बिहारमध्ये पोलिसांनी गोळीबार केल्याचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी शेअर केला. त्या व्हिडिओवर लिहिताना त्यांनी ट्विट केलं की, "ही संपूर्ण व्यवस्था विद्यार्थ्यांप्रति अत्यंत क्रूरच आहे. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एके-47 च्या गोळ्या झाडण्यात आल्याच्या आणि शेकडो विद्यार्थ्यांना अटक करून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आल्याच्या बातम्या आहेत. मोदीजी यांनी विद्यार्थ्यांवर कोणताही एफआयआर दाखल केला जाणार नाही आणि त्यांना सोडले जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले होते, त्यांचे हे आश्वासन कुठे गेले?"
"उलट, त्यांच्यावर प्राणघातक हल्ले आणि क्रूरता केली जात आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांवर पेलेट गनने गोळीबार करण्यात आला आणि बिहारमध्ये एके-47 ने उत्तर प्रदेश असो, पश्चिम बंगाल असो, बिहार असो किंवा दिल्ली असो सर्वत्र पद्धत तीच आहे. मी हे आधीही म्हटले की, हे सरकार अप्रामाणिक आहे. खरी सुधारणा करणे त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. ते आपल्या शब्दांवरून फिरतील आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी प्रत्येक डावपेच वापरतील. मोदीजींनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी. ज्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्यांना चिरडले त्यांच्यावर कारवाई करा स्वतः विद्यार्थ्यांवर कारवाई करू नये," असं राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकारच्या कारभावार गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT












