कॉकरोच जनता पार्टी आता पंजाबमधील 'त्या' मुद्द्यावरही बोलणार, अभिजीत दिपकेंनी सगळं सांगितलं

मुंबई तक

27 Jul 2026 (अपडेटेड: 27 Jul 2026, 11:05 AM)

cockroach janata party founder abhijit dipke next strategy : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलन संपल्यानंतर पुढील रणनीती लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांवरील कोणत्याही प्रकारचे गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

cockroach janata party founder abhijit dipke next strategy

cockroach janata party founder abhijit dipke next strategy

Google CTA

बातम्या हायलाइट

point

कॉकरोच जनता पार्टी आता पंजाबमधील 'त्या' मुद्द्यावरही बोलणार

point

अभिजीत दिपकेंनी सगळं सांगितलं

cockroach janata party founder abhijit dipke next strategy : कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलन संपल्यानंतर पुढील भूमिका आणि रणनीतीबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आंदोलन नुकतेच संपल्याने पुढील नियोजनासाठी काही वेळ द्यावा, अशी विनंती केली. "आंदोलन कालच संपले आहे. पुढील रणनीती आम्ही लवकरच सांगू. आम्हाला थोडा वेळ द्या," असे दिपके यांनी सांगितले.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'ठाकरे चुकले तर त्यांच्याही...' राज यांचं भाषण सुरु असतानाच जेन झी भडकलेली!

सीजेपीच्या आंदोलनानंतर केंदीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा 

सीजेपीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर देशभरात मोठी चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर आता आंदोलन संपल्यानंतर सीजेपी पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे विद्यार्थी आणि संबंधित घटकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 'Friends..', PM मोदींचा नवा Reel; काँग्रेसकडून निवडणूक लढलेल्या व्यक्तीकडे Task Force ची जबाबदारी

कॉकरोच जनता पार्टीचा पुढचा मुद्दा ठरला

पत्रकारांनी पंजाबमधील पेपर लीक प्रकरणाबाबत प्रश्न विचारला असता, अभिजीत दिपके यांनी या विषयावरही पक्षाकडून भूमिका मांडली जाईल, असे सांगितले. "पंजाब पेपर लीक प्रकरणावरही आम्ही बोलू. त्याबाबत सध्या नियोजन सुरू आहे," असे ते म्हणाले. या प्रकरणासंदर्भात पुढील कृती आणि भूमिका योग्य वेळी जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारशी पुढील चर्चेबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिपके यांनी विद्यार्थ्यांवर दाखल झालेल्या किंवा होऊ शकणाऱ्या प्रकरणांवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले. "कोणत्याही विद्यार्थ्यावर कोणताही गुन्हा दाखल होऊ नये, ही आमची भूमिका आहे. त्याबाबत सरकारशी चर्चा सुरू आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या हिताच्या मुद्द्यांवर पुढील भूमिका आणि कृती आराखडा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.