'तो मराठवाड्यात गिळून घेईल तुम्हाला...', जरांगेंनी ऐकवलेल्या खळबळजनक ऑडिओ क्लिपमधील प्रत्येक शब्द जसाच्या तसा...

मुंबई तक

• 02:46 PM • 22 Oct 2026

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी 22 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत एक कथित ऑडिओ क्लिप सादर केली असून, त्यात भाजप, श्रीकांत शिंदे आणि 500 कोटी रुपयांचा उल्लेख असल्याचा दावा केला आहे.

manoj jarange audio clip as it is bjp marathwada 500 crore shrikant shinde

ऑडिओ क्लिपमधील प्रत्येक शब्द जसाच्या तसा...

Google CTA

छ. संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी आज, 22 ऑक्टोबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक कथित ऑडिओ क्लिप समोर आणत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे नेते आणि काही वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या संभाषणाची ही क्लिप असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून भाजपने मनोज जरांगे यांना 500 कोटी रुपये दिल्याचा उल्लेख असल्याचा त्यांचा दावा आहे.

हे वाचलं का?

जरांगेंनी समोर आणलेल्या या कथित ऑडिओ क्लिपमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या क्लिपमधील दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. पण या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय बोललं गेलंय? कोणत्या संदर्भात हा संवाद झाला आहे? आणि 500 कोटींचा उल्लेख नेमका कसा करण्यात आला आहे?

मनोज जरांगेनी ऐकवलेल्या खळबळजनक ऑडिओ क्लिपमधील संवाद जसाच्या तसा... 

पहिली व्यक्ती: शिवेंद्रराजेंचा जो व्हिडिओ केला तोच मुद्दा मांडावा.. उदयनराजेंनी बोलावं, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षांनी बोलावं. दरेकर, राणे बोलतच आहेत.. त्यांचं आपण सोडून देऊ.. पण या लोकांना बोलतं केलं पाहिजे. कारण तो (जरांगे) भाजप पक्षच मराठाद्रोही आहे असं घोषित करतोय. आणि तो मेसेज कमी-अधिक प्रमाणात असेल काय असेल.. त्याचा प्रभाव राहिलाय नाही राहिलाय.. पण तो होतोय.

त्याला भाजपमधील मराठा पुढाऱ्यांकडून उत्तर देणं, काही इंटरव्ह्यू देणं.. संधी साधून बोलणं.. हे करायला पाहिजे. 

दुसरी व्यक्ती: बरोबर आहे.. केवळ मराठा नेते नाही.. ओबीसीमधील देखील सर्व भिडले पाहिजे. 

पहिली व्यक्ती: तो (जरांगे) आता वेगवेगळ्या मुद्द्यांना हात लावतच राहील. त्या प्रत्येक मुद्द्यावर काही तरी वातावरण तयार करत राहील. नरेटिव्ह तो तयार करून टाकतो आणि आपण मग त्या नरेटिव्हला उत्तर कसं द्यायचं या भानगडीत राहतो. 

दुसरी व्यक्ती: उदयनराजेंशी बोलता येईल, अतुलजी? 

तिसरी व्यक्ती: उदयनराजेंशी मला डायरेक्ट नाही बोलता येणार.. पण या बाकी सगळ्या नावांशी मी आज बोलतो. आज मी मुंबईत आहे. नंतर पालघरला आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे आज दिवसभर तेच चालत राहील. 

पहिली व्यक्ती: काल निरंजन डावखरे आले होते.. तेव्हा त्यांना काही त्याच्याविरोधातील मराठा लोकांशी बोलणं करून दिलेलं आहे. त्याच्या (जरांगेंच्या) विरोधातील 2-4 लोकं जाऊन बोलून दिलेत.. दरेकरांशी एक ग्रुप जोडून दिलेला आहे. 

माझं म्हणणं आहे.. आपण शुचिता आणि पवित्रात पाळून जे काही करायचं नाही असं म्हणतोय त्याने आपलं डॅमेज होतंय. आता जर कोणी इच्छुक त्याच्याविरोधात (जरांगे) बरळायला तयार असेल तर असतील सांजंच्या भेटवावं, नाचवावं, मोकळं करावं.. आणि हस्ते-परहस्ते करून त्याला त्याच्या (जरांगे) डॅमेज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास काय हरकत आहे? 

दुसरी व्यक्ती: सुरू केलं पाहिजे आता.. 

तिसरी व्यक्ती: आणि आपल्या हाताने नको असेल तर दुसऱ्याच्या हाताने करू ना.. तशी माणसं आमच्याकडे आहेत.. माझं मत आहे की, पार्टीचा फंड वापरायचा नसेल यासाठी तर इंड्यूव्हि्यूजव्हल लोकांनी फंड वापरावा, द्यावं..  त्याला मोर्चाचा खर्च द्या.. असं करण्यापेक्षा त्याला सरळसरळ बोलून करून टाकावं. 

सोशल मीडियावर फक्त कंटेंट काय द्यायचा यावर चर्चा करण्यापेक्षा कंटेंट क्रिएशनची चर्चा करूया असं मला वाटतं 

तिसरी व्यक्ती: खरंय.. खरंय.. 

पहिली व्यक्ती: नाही.. आवरलं ना.. मी हे भविष्य सांगून ठेवतो.. आपण सगळेच जाणकार आहात. जर नाही आवरलं तर.. हा (जरांगे) अक्षरश: गिळून घेईल मराठवाड्यात तुम्हाला.. 

दुसरी व्यक्ती: काय सुशीलजी.. प्रॉब्लेम जो मला दिसतोय तो असा आहे ना.. की, पक्षातील कोणी काही बोलायलाच तयार नाही.

पहिली व्यक्ती: मराठवाड्यातील त्याच्या (जरांगे) विरोधातील लोकं बोलायला तयार आहेत ना.. त्यांना बोलतं करणं, त्यांना अॅक्टिव्ह करणं.. त्याला नुसतंच टोपे पैसे देतोय, शरद पवार पैसे देतायेत.. हा पैसे देतोय.. तो पैसे देतोय.. असा आरोप करून आपण मोकळे होतोय. त्याच्या विरोधातील चार जणांना आपण का नाही द्यायचे? आपल्याकडे नाहीत काय?

तिसरी व्यक्ती: घेऊ जरा.. सीरियसली घेऊ विषय... तुम्ही निरंजनजींशी बोललात तर होईल काही तरी 

पहिली व्यक्ती: निरंजनजी यांना चार लोकांच्या भेटी घालून दिल्या.. एक वेगळा ग्रुप मी दरेकरांना भेट घालून दिलाय.. अडचण काय होतेय.. या माणसांना अपेक्षेने गाठभेट घालून दिली.. आणि ते बैठक, प्रस्ताव, मंजुरी याला विचारा, त्याला विचारा.. या पातळीवर गेलं की ही माणसं म्हणतात आम्ही काय भिकारी आहोत का? ते उगाच स्वत:ला भिकारी समजतात. 

तसं होऊ नये म्हणून भेट घालून देताना भीती वाटते उगाचच.. आपण भेट घालून देऊन पुढे अडचण होईल असं होतं ते..

दुसरा व्यक्ती: अजिंक्यजी होते ना काल? 

पहिली व्यक्ती: अजिंक्यजी होते काल..

दुसरा व्यक्ती: बघू.. बोलतो मी

पहिली व्यक्ती: चला, पुढचा मुद्दा 

दुसरी व्यक्ती: अतुलजी थोडं आर्थिक याच्यावर लिहिलं पाहिजे.. जे आज लोकसत्ताने बऱ्यापैकी चांगलं लिहिलं असं मला वाटतंय.. अग्रलेख आणि लेख असे दोन्ही बरे वाटले. म्हणजे एक तर कसं की, आता अमेरिकेतील काय परिस्थिती आहे.. चीनची काय परिस्थिती आहे.. तिथलं काय चाललंय.. आणि तो अर्णवचा व्हिडिओही चांगला आहे.

चायनामध्ये लेबर आणि असं सगळं घसरलंय.. आणि यांना मदत करण्यासाठी राहुल गांधी किंवा हे आपल्या देशाला.. असा अर्णव स्टाइल व्हिडिओ आहे ना.. ते चालवा.

तिसरी व्यक्ती: हो... 

दुसरी व्यक्ती: लोकांना कळतंय.. नाही अशातला भाग नाही.. 

तिसरी व्यक्ती: हो...

दुसरी व्यक्ती: असं व्यवस्थित व्हिडिओ व्हायरल केले तर बरं राहील.. बाकी यातील काही गोष्टी न बोलता कराव्या लागतात.. काही बोलून कराव्या लागतात.. जे काही हे ते.. 

तिसरी व्यक्ती: हो...

तिसरी व्यक्ती: त्यावर एक लेख लिहितो आज.. त्यांचं माझं विशेष प्रेम असल्यामुळे... 

दुसरी व्यक्ती: कोणाचं? तुम्ही लिहा.. बघू कसं छापत नाही.. तुम्ही लिहा पुढचं पुढे बघू.. तुम्ही प्रयत्न करून बघा.. नाही दिलं तर ते आम्ही बघतो.

पहिली व्यक्ती: अजयजी.. बघू आता कसं छापत नाही.. 

दुसरी व्यक्ती: असं कसं चालेल आता ते.. चहा प्यायलाच जायचं का, नुसतं जेवायलाच जायचं का? पुढे काही करणार आहेत की नाही.. 

दुसरी व्यक्ती: महाराष्ट्र टाइम्सलाही वैगरे छापून आणण्याची रचना केलीए काही ना काही.. तुम्ही लेख लिहा.. मटा तशी अडचण नाहीए.. नॉर्मल.. हा कसा मोटिव्हेटेड आहे... मोटिव्हेटेड नाही डीप स्टेट आहे माझ्या भाषेत.. चक्क.. 

तिसरी व्यक्ती: ईव्हीच्या विरोधात लिहिल्यापासून मलाही जराही त्याचं डीप स्टेटचा विरोध कळतोय.. 

दुसरी व्यक्ती: गिरीश सारख्याने असं लिहावं याचं मला कौतुक वाटलं.. म्हणजे बोलत असतो त्याला मी.. नाही तर काय काही लिहितो.. अजून हे आता पुतळ्याचा मुद्दा थोडा शांत होईल.. लोकांचा आक्रोश आणि.. काही गोष्टीला काळ उत्तर असतं.. विजय वडेट्टीवारला प्रश्न विचारावे..  

तिसरी व्यक्ती: ते एक क्लिप खूप व्हायरल होतेय.. आयबीएन लोकमतची.. म्हणजे त्यात असं झालं की, लोकांना ते समज की या दोघांनीच बनवलंय.. आणि यामागे उद्धव ठाकरेंचाच हात आहे. 

दुसरी व्यक्ती: केली राजा.. करावी लागली.. हाहाहाहा

तिसरी व्यक्ती: वाचवायला आदित्य ठाकरे गेला होता..

पहिली व्यक्ती: हे सगळं शिकलं पाहिजे.. हा शब्द थोडा चुकीचा आहे पण हे सगळं करावं लागेल.. फक्त एवढं माझं म्हणणं आहे.. दोन-पाच, दहा हजाराचं काम आहे. फार मोठं काम नाही. असे जे छोटे-छोटे मीडिया आहे.. खालचं लोकल.. ते दिल्यानंतर ती न्यूज काढून तर टाकणार.. 

दुसरी व्यक्ती: काल खाली लोकसत्ताने न्यूज दुसरी दिली आणि वर सरसंघचालकांचा फोटो टाकला. त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर काढली न्यूज. 

तिसरी व्यक्ती: डिजिटलला?

दुसरी व्यक्ती: हो.. डिजिटलला.. पण काढली त्यांनी... त्याच सपोर्ट घेऊन लोकं स्प्रेड करतात ना.. कालची आयबीएनची बातमी चालवली आपण भरपूर.. त्याच्यात काय त्या सावंताचा.. हा उदय सावंत.. नाही उदय नाही.. काय तो दुसरा सावंत..

पहिली व्यक्ती: त्याच्यावरच मी जय महाराष्ट्रवर बोललो ना.. आणि कुठलं तरी एक चॅनल होतं त्यांनी त्यावर रिअॅक्शन मागितली. 

पहिली व्यक्ती: मी म्हटलं.. तोंड काळं करा या दोघांनी.. 

दुसरी व्यक्ती: लाज वाटली पाहिजे. 

पहिली व्यक्ती: एकदा थोडंसं तुम्ही हेडऑन ह्यालाही घ्यावं लागेल.. राऊताला.. एका बाईशी बोलताना काय भाषा बोलतो आणि आज गृहमंत्र्याला विचारतो की, कारवाई करत नाही आणि काही.. याच्यावर कारवाई करायची का? सन्माननीय राऊतांवरच आधी कारवाई करायची का? 

दुसरी व्यक्ती: हो..
 
पहिली व्यक्ती: इथून सुरुवात करावं लागेल की, यांची भाषा काय आहे.. राणेंची भाषा आपली काय आहे ती सोडून द्या.. त्याला ठाकरी भाषाच असंच नाव...

पहिली व्यक्ती: बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचा बाप होता.. आमचा बाप तो बाप... मी बोललोय व्हिडिओत.. 

दुसरी व्यक्ती: नाही आता अतुलजींनी काही जणांना हेडऑन घेणं.. भाजपमध्ये काही जणांना सुरु करावं लागेल.

पहिली व्यक्ती: आम्ही माणसं मारत नाही वैगरे.. असे काही स्टेटमेंट करावे लागतील. तुम्ही तर पोलिसांना सुपाऱ्या देऊन माणसंच मारली, बॉम्ब ठेवले.. असं तर करत नाही आपण.

दुसरी व्यक्ती: नाही.. एक व्हिडिओ आहे.. उद्धव ठाकरे म्हणतो की, कमिशनरला भांडी घास वर्षावर.. हा व्हिडिओ होता उद्धव ठाकरेचा 2018 मधला.. 

तिसरी व्यक्ती: तो कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेसचा होता.. 

दुसरी व्यक्ती: काही जणांना हेडऑन घेणं आता.. तिच्या नादी लागू नये ती एकदमच खालच्या लेव्हलला आहे.. अंधारे.. ती कलाकारच आहे म्हणजे.. तिच्या नादालाच लागायचं नाही. 

पहिली व्यक्ती: त्यांच्या नादाला लागूच नये.. सगळं जमतंय प्रॉपर्टी.. 

महिला: चर्चा के विषय मैं दो अपॉईंट करना चाहूँगी... एक जरांगे-पाटील को..  ऑलरेडी 500 करोड रुपये पहुँच चुँके है. जो श्रीकांत शिंदे के पास से पहुँच चुँके है.. अब जरांगे-पाटील विधानसभा चुनाव मैं हमारे फायदे का रहेगा, नहीं फायदे का रहेगा इसपर मेरा मत अलग है.. कॅलक्युलेशन अलग है.. बाकी आप लोग सोचते है वो.. जो तथ्य है वो है ही... 

मुझे लगता है की, जरांगे-पाटील के साथ हमे देखना चाहिए की, उसका पर्सनल टार्गेट देवेंद्र फडणवीस और बीजेपी रहेगा.. बाकी विधानसभा मैं हमारे फायदे का थर्ड फ्रंट बन सकता है.. इसलिए मुझे पर्सनली यही लगता है की, जरांगे-पाटील के विषय मैं हमे सिर्फ पर्सनल टार्गेट से बचना भी होगा.. और उसको पर्सनल टार्गेट भी करना होगा.. 

हॅविंग सेड दॅट.. जो विषय हमारे काम के नहीं है.. उस विषय के उपर हम बहुत जवाब देते है.. लेकिन जो विषय हमारे काम के है वो.. विषय हम मुद्दा भी नहीं बना पाते, उठा भी पाते.. 

जैसे श्रीरामपूर मैं एक एससी लड़के को कन्व्हर्ट कर दिया गया.. वो लडके का नाम लोखंडे है.. और उसको कन्व्हर्ट कर के उसको नमाज पढाया.. उसके घर मे उसके पिताजी को धमकाया.. और बहुत सारी चीजे हुई.. पर इस विषय मैं.. अभी तक किसी ने ना आवाज उठायी है ना सोशल मीडियापर हम इस को बहुत बड़ा विषय बना पाये है! 

तो ऐसे जो पोलरायझिंग विषय है.. ऐसे विषय उठा कर जो हमारे विषय हो सकते है... हमे जैसे.. महाराष्ट्र से कुछ विषय हटाना है.. तो हमे ऐसे विषय उठाने पडेंगे और इसको बड़ा करना पडेगा. ये मेरा आज का मत है.

पहिली व्यक्ती: श्वेता जींच्या विधानानंतर माझ्या मनात अजयजी बाहेर पडले..  मला एक सबमिशन करायचं आहे. जरांगेंच्या आरोपामध्ये मदत करणाऱ्यांमध्ये भाजपचे नेते पण आहेत. ही माहिती आहे.. मग ही थर्ड फ्रंटसाठी चालू आहे की, फडणवीसांना बदनाम करण्यासाठी चालू आहे? याबाबत बोलता येईल.. हा काही चर्चेचा विषय नाही. फक्त एक माहिती म्हणून देतो. 

नंबर दोन.. श्रीरामपूरचा विषय कळला, संभाजीनगरचा एक विषय.. त्याची बातमी मी टाकली होती. त्या विषयामध्ये ना विखेंनी मत व्यक्त केलंय ना संभाजीनगरच्या मराठा नेत्यांनी मत व्यक्त केलंय.

दुसरी व्यक्ती: लव्ह जिहादचा? 

पहिली व्यक्ती: हो.. लव्ह जिहादचा... पूजा पवारही झालाय आणि त्या पोराला मारलंय पण. ती काल बातमी टाकलीय मी. एका बँकेच्या कर्मचाऱ्याने मुस्लिम महिलेला गाडीवर नेऊन दुसऱ्या ब्रँचमध्ये सोडलं. म्हणून त्याला तुफान धुतला. संभाजीनगरमध्ये.. याच्या आधी बोलत होता म्हणून मैदानावर मारलं. पूजा पवारला मारणारा मुसलमानच.. 

हे एवढं सगळं घडत असताना.. संभाजीनगरमधून एकालाही त्या विषयावर निषेध करावा वाटत नाही. हे भाजपच्या लोकांना करायला लावलं पाहिजे. 

महिला: सुशीलजी.. लंके ने श्रीरामपूर मैं.. राम का नाम हटा दिया था पोस्टर मैं.. उसका व्हिडिओ है.. पर हम उसका विषय नहीं बना पाते.. क्यूँ की हमारे पास बोलने के लिए लोग नहीं है..

दुसरी व्यक्ती: एक मुद्दा.. कर्नाटकचा आहे.. पण मला वाटतंय की त्याचं कारण धनुष्यबाण आहे.. म्हणून सांगतोय. जे हनुमानजींचं जन्मस्थळ त्याच्या पोस्टरवर धनुष्यबाण, गदा असे वेगवेगळे रामायणाचे चित्र होते. एसडीपीआयच्या तक्रारीवर धनुष्यबाण काढले काँग्रेसने.. पूर्ण शहरात धनुष्यबाण आणि रामायणचे प्रत्येक चिन्ह काढले होते. 

आता मला वाटतं की, यामध्ये उद्धव ठाकरेंना विचारू... आता काँग्रेसनेच हटवलं.. 

तिसरी व्यक्ती: नाही मला काय वाटतं सुशीलजी.. अजयजी पण आहेत.. हे भाजपच्या नावावर करण्यापेक्षा किंवा.. म्हणजे कसंही.. करू शकतो आपण.. यात दोन मुद्दे मला जे वाटतायेत. हे व्होट जिहादचं राजकारण आणि मुस्लिम आक्रमण हा एक मुद्दा. आणि दुसरं जे मराठा समाजाचं ओबीसीकरण करा.. अशी मागणी जरांगे वारंवार करतायेत.. या दोन विषयाला घेऊन.. वेगवेगळ्या ठिकाणावरून, वेगवेगळ्या लोकांनी , वेगवेगळ्या बॅनरखाली यात्रा नाही.. पण असा काही प्रचाराचा कॅम्पेनच केला पाहिजे. ठिकठिकाणी मीटिंग घेणं. त्याला सभा, चर्चा असं काही केलं ना.. तर वातावरण ढवळून निघेल. काही ना काही.. 

म्हणजे त्या काही प्रचंड मोठ्या सभा होतील असं मी म्हणत नाही.. पण असं एक कॅम्पेन प्लॅन करून केलं तर त्याचा आपल्याला एक नक्कीच फायदा होईल. 

पहिली व्यक्ती: कसंय अतुलजी.. हा खूप फायद्याचा विषय आहे. हा विषय आम्ही पण सातत्याने मांडत आलो आहोत. पाच-सहा कार्यक्रम केलेत देखील आम्ही.. काही लोकांना सोबत घेऊन. अजून आपण करू शकतो. आणि खूप करू शकतो असं.. हे कॅम्पेन करायला फार काही लागत नाही. 

10 माणसं सतत फिरणारी सापडली की, ती.. करतात. मग आमची तयारी आहे त्या विषयामध्ये करण्याची.. 

दुसरी व्यक्ती: मग त्यांच्या त्या गावात जायचं.. सभा घ्यायची, बोंबाबोंब करायची. होर्डिंग लावायची. 

तिसरी व्यक्ती: आजची खालून न्यूज थोडी अशी आहे अतुलजी की, पालघरला काही ठिकाणी काळे झेंडे.. 

दुसरी व्यक्ती: ते होईल.. ते होईल.. मोदींनाही ते दाखवायचा प्रयत्न होईल.. सगळंच होईल.. 

पहिली व्यक्ती: मुंबईमध्ये उबाठा आदित्यवरच्या संभाजीनगरमधल्या कारवाईचा पूर्ण बदला घ्यायच्या तयारीत आहे. 

दुसरी व्यक्ती: पालघरमध्ये वाढवण बंदराच्या इथे काही तरी करणार आहेत. तर ते आपल्याला ट्रेंडिंग करावं लागेल आहे. तिथे काही ख्रिश्चन एनजीओ आहेत. त्याची माहिती पाठवतो मी ग्रुपवर. आणि काही मार्क्सवादी.. असं दोघांचं मिळून आहे ते आंदोलन. 

महिला: अजयजी.. हमने पालघर में तो अच्छी तयारी की है.. जितने लोग आ रहे.. मंडप के अंदर तो कोई काला झेंडा लेकर नहीं आ पायेंगा.. एक-एक आदमी को हम अंदर देख के ही ले रहे है.. पुलिस एसपीजी एकदम फोकस में है.. और हमने भी अच्छी तयारी की है... 

यहाँ से जाने के रस्ते मे अगर 4 लोग खडे होकर 4 लोगोने झंडे दिखा दिया तो उसमे कोई कुछ कर नहीं सकता.. और उसकी वो लोग न्यूज भी बना देंगे. 

दुसरी व्यक्ती: कम्युनिस्ट पार्टी उधर है.. उनका इतना बड़ा संघटन वहाँ पर है. और उन्होंने स्टँड लिया ही है.. वाढवण को विरोध करने का.. 

पहिली व्यक्ती: तर देशविरोधी असं म्हणता येईल आपल्याला.. आणि चायना अमेरिकेचा हात यांच्या पाठिशी असं म्हणता येईल.. देशाच्या प्रगतीला.. म्हणजे आजचा लोकसत्ताचं आर्टिकल चांगले आहेत. लोकसत्ता म्हणून नाही पण जे काही जगात चाललंय आता.. त्याला विरोध.. 

पहिली व्यक्ती: त्यांनी आपणच काही केलं त्याआधीच आपण प्रोअॅक्टिव्हली असं आतापासून चालवलं की, महाराष्ट्रद्रोही चाकर.. पंतप्रधानांच्या दौऱ्याला विरोध करणार आहेत. 

महिला: नहीं.. मैं यही कहने वाली थी अभी.. देखिए क्या है.. हमे ये बनाना चाहिए की.. अमेरिकन अॅम्बेसेडर और अमेरिकन बहुत सारे लोग.. महाराष्ट्र में.. घूम रहे हे.. देश में घूम रहे है.. अपोजिशन लीडर से मिल रहे है. और बांगलादेश करने की प्लॅनिंग ये लोग अभी से कर रहे है. इसके तहयेत जोडकर ये लोग बांगलादेश करने वाले है. और इसके अंदर आप देखेंग तो.. आप देखेंगे तो सुशीलकुमार बावडा नासिक में ट्राय कर रहै या.. जो कम्युनिस्ट संस्था पालघर में ट्राय कर रहे है.. ये सब को जोडकर हमे कहना चाहीए की, इतनी अॅक्टिव्हिटी बुलंद है. शरद पवार से ये मिला.. उससे ये मिला.. ऐसी कर के.. हम को.. इन्फ्ल्यून्सर की माध्यम से ये बात फैलानी शुरू कर देनी चाहीए.. की कही ना कही अनरेस्ट करने की तयारी अमेरिका कर रहा. 

क्यूँ की.. उनकी इलेक्शन अब होने वाले है.. और उनके इलेक्शन में वो चाहते है की.. लेफ्ट फोर्सेस आगे आये और इंडिया.. अभी बहुत आगे है.. यह सब कर के अगर हम एक कम्युनिटी कर पाये और लोगो तक पहुँचा पाये तो. हमारा एक नरेटिव्ह अच्छा बन सकता है और लाँगटर्म तक बन सकता है.. ऐसी मेरी सोच है.

दुसरी व्यक्ती: विकासाला विरोध कोण करतंय महाराष्ट्रात. असं म्हणून सुरू करावं लागेल. यांच्या सगळ्याची नावं दिली पाहिजे जाऊ दिली पाहिजे.  

चौथा व्यक्ती: अजयजी अपना जो ट्रेंडिंग हॅशटॅग है पार्टी का.. उसके साथ-साथ महाराष्ट्रविरोधी जो ताकद ये करने वाली है.. उसमे सब आ गया.. उबाठा भी आ गया.. मार्क्सवादी भी आ गया.. और मिशनरी भी आ गये..

तिसरी व्यक्ती: जितेन भाई.. अपने जो इन्फ्ल्यूएन्सर है, एमएलए है.. उनो ने भी किया तो उसका इम्पॅक्ट बनता है.. सगळ्यांना फोन करून निखिल काय करता येईल ते बघा.. थोडं आपणच प्रो ट्रेंडिंग केलं तर त्यांचं अँटी होतं. विकासाला विरोध

चौथा व्यक्ती: महाराष्ट्राच्या विकासाला विरोध...

पाचवी व्यक्ती: दुपारी ट्रेंडिंग आहे.. त्यासाठी आपण सगळ्यांना फोन लावतो सर्वांना.. फक्त तो पॉझिटिव्ह ट्रेंड आहे. फक्त त्यात वाढवण हा कसं काय विषय होता. 

तिसरा व्यक्ती: त्यात दोन करावं.. त्याला विरोध कोण करतंय आणि पॉझिटिव्हही करावं. 

पाचवी व्यक्ती: येस येस..

तिसरी व्यक्ती: निखिलजी.. देवेनजी असतील, जितेनजी असतील, अतुलजी असतील सगळ्यांनी करावं. म्हणजे ते ट्रेंडिंगमध्ये येतं.

दुसरी व्यक्ती: दोन्हीकडून गेलं पाहिजे.. असं वाटतं मला.. निखिल हॅशटॅग काय तोही टाक मला.. आज करू आपण

पाचवी व्यक्ती: ठीकए.. मोदी@वाढवण असं म्हणून टाकू.. मी सगळी माहिती टाकतो तुम्हाला ती.. 

दुसरी व्यक्ती: हो.. विरोधातीलही काही.. तुमच्याकडे काही असतील ते आणि माझ्याकडे काही असतील ते पण.. मी टाकतो. नावं टाकू आपण सरळसरळ.. की, हे विरोध करतात. म्हणजे प्रगतीच्या विरोधात. आदिवासींना गरीबच ठेऊ इच्छितात. असं म्हणून करावं लागेल. जनजाती मोठे झाले तर यांची दुकानं बंद होतील.. असं आपल्याला करावं लागेल.

आज तरुण भारतने दिलंय फुल पेज.. चांगलं आर्टिकल आहे.. म्हणजे लोकांची मतं चांगली आहेत. 

तिसरी व्यक्ती: जमीन अधिग्रहण करत बसल्यामुळे लोकांचा तो विरोध मावळलाय.. दुकान बंद झाले आहेत त्यामुळे ते चिडले आहेत. 

पहिली व्यक्ती: तिथले काही नेते आहेत.. तथाकथित.. म्हणजे त्यांचा एमपीसीएल म्हणजे अण्विक प्रोजक्टला विरोध होता त्यांचा.. दोन गावं बाजूला केले.. आणि विशाखा राऊतपासून सगळे आहेत त्याच्यात गाववाले म्हणून.

तिसरी व्यक्ती: तीनपर्यंत फ्लॅग होतोय.. 

दुसरी व्यक्ती: हेलिकॉप्टर उतरेल.. तारापूरला सोय आहे ती.. 

तिसरी व्यक्ती: नाही पालघरला जाणार..