प्रियंका गांधींनी 'ते' प्रकरण काढताच नव्या शिक्षणमंत्र्यांसह सगळेच भिडले, का?

मुंबई तक

• 09:03 AM • 29 Jul 2026

प्रियांका गांधींचं संसदेतलं भाषण चांगलंच गाजलं. यामध्ये नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबत त्यांनी केलेल्या स्टेटमेंटनंतर तर जोरदार राडाच झाला. दोनचार मंत्री आणि सत्ताधारी खासदार उठून उभे राहिले. गदारोळ वाढला अखेर अध्यक्षांनी कसंबसं मध्यस्थता केली आणि विषय पुढे नेला. प्रियंका गांधी नेमकं काय म्हणाल्या, जाणून घेऊया.

Priyanka Gandhi

Priyanka Gandhi

Google CTA

बातम्या हायलाइट

point

प्रियंका गांधींनी 'ते' प्रकरण काढताच नव्या शिक्षणमंत्र्यांसह सगळे भिडले

point

ते प्रकरण काय आहे?

Priyanka Gandhi : संसदेत सध्या नवीन शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नियुक्तीवरून आणि त्यांच्या एका जुन्या वक्तव्यावरून जोरदार राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी लोकसभेत बोलताना प्रल्हाद जोशी यांच्यावर गंभीर आरोप केले, ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि सभागृहाचे कामकाज काही काळासाठी विस्कळीत झाले.

हे वाचलं का?

प्रियंका गांधींचा लोकसभेत गंभीर आरोप

सभागृहात चर्चेदरम्यान प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत, "पंतप्रधानांनी अशा व्यक्तीची देशाच्या शिक्षण मंत्रीपदी निवड केली आहे, ज्यांनी एका गरोदर महिलेवर (बिलकिस बानो) बलात्कार करणाऱ्या आरोपींच्या सुटकेचे समर्थन केले होते," असा थेट आरोप केला. प्रियंका गांधी यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री तात्काळ आक्रमक झाले.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि सत्ताधारी खासदारांनी प्रियंका गांधी यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला. नियम 353 चा हवाला देत त्यांनी स्पष्ट केले की, सभागृहात कोणत्याही सदस्यावर किंवा मंत्र्यावर पूर्वसूचना न देता आणि पुराव्यांशिवाय असे गंभीर आरोप करता येत नाहीत. प्रल्हाद जोशी यांनी प्रियंका गांधी यांचे विधान 'चारित्र्यहनन' (कॅरेक्टर अससिनेशन) करणारे असल्याचे सांगत ते रेकॉर्डवरून हटवण्याची (एक्सपंज करण्याची) मागणी केली आणि त्यांनी माफी मागावी अशी जोरदार मागणी केली.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा यलो-ऑरेंज अलर्ट, 'या' जिल्ह्यांवर आस्मानी संकट

सभागृहातील गदारोळ आणि पीठासीन अधिकाऱ्यांची मध्यस्थी

विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील सदस्यांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला. काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल आणि इतर सदस्यांनी वृत्तपत्रांचे दाखले व पुस्तकांचे संदर्भ देण्याचा प्रयत्न केला, तर अध्यक्षांनी स्पष्ट निर्देश दिले की कोणतेही विधान सिद्ध करण्यासाठी नियमानुसार आधी ते 'ऑथेंटिकेट' (प्रमाणित) करणे बंधनकारक आहे. नियम आणि मर्यादेत राहूनच विधेयकावर चर्चा व्हावी, असे आवाहन पीठासीन अधिकाऱ्यांनी करत मध्यस्थी केली.

हे ही वाचा : Personal Finance: घर घेणं म्हणजे सर्वोत्तम Investment की हा सर्वात मोठा गैरसमज?

राहुल गांधींचा थेट प्रहार

संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर तुफान हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले, "देशातील तरुण आणि विद्यार्थिनी शिक्षण व्यवस्थेविरोधात आणि स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जात आहे. अशा वेळी पंतप्रधानांनी बलात्काऱ्यांना संरक्षण देणाऱ्या आणि त्यांची ढाल बनणाऱ्या व्यक्तीची शिक्षण मंत्री म्हणून निवड केली आहे. बलात्काऱ्यांचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक वाईट मानसिकतेची व्यक्ती दुसरी कोणती असू शकते?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा : 'मोदींनी कॅमेऱ्याचा नाही मनाचा अँगल बदलावा..', प्रियांका गांधींची लोकसभेत तुफान फटकेबाजी

काय आहे 'बिलकिस बानो' प्रकरणाचा संदर्भ?

प्रियंका गांधी यांनी काढलेला हा विषय मार्च 2002 मधील गुजरात दंगलीशी आणि बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणाशी संबंधित आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी गुजरात सरकारने या प्रकरणातील 11 दोषींची मुदतपूर्व सुटका केली होती. त्या वेळी तत्कालीन केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री असलेल्या प्रल्हाद जोशी यांनी एका वक्तव्यात असे म्हटले होते की, "कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून आणि दोषींनी 14 वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगल्यामुळे कायद्यातील तरतुदींनुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे, त्यात काहीही चुकीचे नाही."

प्रल्हाद जोशी यांच्या याच जुन्या विधानाचा धागा पकडत प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी संसदेत आणि संसदेबाहेर भाजपला आणि पंतप्रधान मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. या राजकीय घमासानामुळे संसदेतील वातावरण चांगलेच तापले असून राजकीय वर्तुळात यावर आता तीव्र चर्चा सुरू झाली आहे.