नवी दिल्ली: लोकसभेत सध्या पेपरफुटी प्रतिबंधक विधेयकावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान, प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. त्यामुळे सभागृह स्थगित देखील करावं लागलं आहे. जाणून घ्या सभागृहात नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT
प्रधान नव्हे, तर RSS शिक्षण मंत्रालय चालवत होते - राहुल गांधी
लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते वितरण आणि तपासणीपर्यंतच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही परीक्षा पद्धत नसून खंडणीची पद्धत आहे. या शर्यतीत प्रामाणिक विद्यार्थी मागे पडत आहेत. 30 ते 40 लाख रुपयांसाठी प्रश्नपत्रिका फुटत आहेत. राजनाथ सिंह म्हणाले होते की, हे यूपीए सरकार नाही, जिथे मंत्री राजीनामा देत नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.
हे ही वाचा>> 'प्रधान हटवून यांनी पंतप्रधान वाचवला' अखिलेश यांचे भाषणात टॉन्ट, डिंपलही हसल्या
शिक्षण व्यवस्थेत खासगी कंपन्यांचा सहभाग आहे. खासगी कंपन्या परीक्षा घेत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिक्षण व्यवस्था ताब्यात घेतली आहे. धर्मेंद्र प्रधान नव्हे, तर आरएसएस शिक्षण मंत्रालय चालवत होते. आम्ही गृहमंत्र्यांना कार कॅडेटमध्ये पाहिले. ते कुठे आहेत? सभागृहात बसायची त्यांची हिंमत नाही.
राहुल गांधी पुढे म्हणाले, "तुम्ही विद्यार्थ्यांवर गोळीबार करता, आणि गृहमंत्र्यांमध्ये येथे बसायची हिंमत नाही."
दरम्यान, यामुळे लोकसभेत मोठा गदारोळ झाला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "राहुल गांधी खूप चुकीचे बोलले आहेत. तुम्ही असे म्हणू शकत नाही. त्यांनी हे कोणत्या आधारावर म्हटले? गोळीबाराच्या आदेशाबद्दल तुम्हाला कोणी सांगितले?" जेव्हा सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी राहुल गांधींच्या माफीची मागणी केली, तेव्हा विरोधी सदस्यांनी गृहमंत्र्यांच्या माफीची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली.
राहुल गांधींच्या भाषणात वापरलेल्या 'इडियट' या शब्दावरून गदारोळ
राहुल गांधी म्हणाले, "मला वाटले की एक इडियट आणि एक विद्यार्थी आहे. मी त्यांना विचारले की तिसरी श्रेणी कोणती? तर तिसरी श्रेणी म्हणजे अंधभक्त.. विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेबद्दल बोलत आहेत."
हे ही वाचा>> प्रियंका गांधींनी 'ते' प्रकरण काढताच नव्या शिक्षणमंत्र्यांसह सगळेच भिडले, का?
राहुल गांधींच्या या विधाननंतर सत्ताधाऱ्यांनी जोरदार गदारोळ केला. त्यांनी आक्षेप घेतला की, राहुल गांधी असंसदीय शब्द वापरत आहे. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी सांगितले की, कोणताही असंसदीय शब्द खपवून घेतला जाणारा तो कामकाजातून काढून टाकला जाईल.
राहुल गांधी म्हणाले, "मी 'मूर्ख' या शब्दाऐवजी दुसरा शब्द वापरेन." त्यावर अध्यक्षांनी उत्तर दिले, "तुम्हाला यासाठी तरतूद करण्याची गरज नाही; मी आधीच तरतूद केली आहे." राहुल गांधी म्हणाले, "विद्यार्थी सतर्क आहेत आणि त्यांना सत्य माहीत आहे. एका परीक्षेचा खर्च शिक्षण बजेटपेक्षा जास्त असतो. अंधभक्त मूर्खांना देव मानतात." अशा शब्दात राहुल गांधींनी मोदी सरकारवर लोकसभेत टीका केली.
ADVERTISEMENT












