पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा संपन्न, पुण्यातील समारंभाला दिग्गजांची उपस्थिती

मुंबई तक

• 08:22 AM • 30 Jul 2026

parth pawar kaiynaat dara engagement : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार यांचा कायनात दारा यांच्यासोबत पुण्यात साखरपुडा पार पडला. या समारंभाला राज्यातील अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली.

parth pawar kaiynaat dara engagement

parth pawar kaiynaat dara engagement

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा संपन्न

point

कायनात दारा कोण आहेत? 

parth pawar kaiynaat dara engagement : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांचा कायनात दारा यांचा साखरपुडा पुण्यातील एका हॉटेलमध्ये पार पडला. या समारंभाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री आणि प्रमुख राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे होणार आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : 12 वर्षीय मुलाचा बाराव्या मजल्यावरून तोल जाऊन मृत्यू, शेजारच्यांकडून कुटुंबाला माहिती

अजितदादांच्या मृत्यूनंतर पार्थ पवारांवर मोठी जबाबदारी 

पार्थ पवार हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र असून, जानेवारी महिन्यात विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. साखरपुड्याच्या कार्यक्रमानंतर त्यांच्या होणाऱ्या पत्नीबाबत विविध वृत्तवाहिन्या, डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडियावर काही तथ्यात्मक त्रुटींसह माहिती प्रसारित झाल्याचे समोर आले होते. विशेषतः त्यांच्या नावाचे चुकीचे स्पेलिंग तसेच कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीबाबत चुकीचे उल्लेख झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून कायनात दारा यांच्याकडून त्यांच्याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आली आहे. 

हेही वाचा : 12 वर्षीय मुलाचा बाराव्या मजल्यावरून तोल जाऊन मृत्यू, शेजारच्यांकडून कुटुंबाला माहिती

कायनात दारा कोण आहेत? 

 पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे अधिकृत नाव कायनात दारा असे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  त्या पंजाबी हिंदू धर्मीय असून क्षत्रिय समाजातील आहेत. त्यांचे गोत्र कश्यप आहे. काही माध्यमांमध्ये त्यांचा "काश्मिरी" असा झालेला उल्लेख वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांनी नवी दिल्लीतील चाणक्यपुरी येथील द ब्रिटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी लंडन येथील द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) मधून इंटरनॅशनल रिलेशन्स विषयात Bachelor of Science (B.Sc.) – First Class Honours ही पदवी संपादन केली आहे.

उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर कायनात दारा यांनी भारतातील इंग्रजी वृत्तवाहिनी NDTV 24x7 मध्ये Output Editor आणि Reporter म्हणून काम केले आहे. सध्या त्या आपल्या कुटुंबाच्या Hospitality आणि Real Estate व्यवसायात कार्यरत आहेत. अधिकृत माहितीनुसार, त्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक तसेच कौटुंबिक पार्श्वभूमीबाबत अचूक माहिती समाजासमोर यावी आणि कोणताही संभ्रम राहू नये, या उद्देशाने ही माहिती राष्ट्रवादीकडून प्रसिद्ध करण्यात आली होती. विवाह सोहळा 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे पार पडणार असल्याची माहितीही कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे.