ओमिक्रॉनपेक्षा ‘ओ मित्रो’ जास्त धोकादायक, याचा ‘सौम्य प्रकार’ही नाही-शशी थरूर

मुंबई तक

• 08:45 AM • 31 Jan 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणाची सुरूवात मित्रों अशी करतात. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ओ मित्रो हा ओमिक्रॉनपेक्षा जास्त धोकादायक आहे. त्याचा कुठला सौम्य प्रकारही नाही. असं म्हणत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नेमकं काय म्हटलं आहे थरूर यांनी? ओमिक्रॉनहून जास्त […]

Mumbaitak
follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणाची सुरूवात मित्रों अशी करतात. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ओ मित्रो हा ओमिक्रॉनपेक्षा जास्त धोकादायक आहे. त्याचा कुठला सौम्य प्रकारही नाही. असं म्हणत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

हे वाचलं का?

नेमकं काय म्हटलं आहे थरूर यांनी?

ओमिक्रॉनहून जास्त घातक ओ मित्रो आहे. ध्रुवीकरण, द्वेष आणि धर्मांधतेला पाठिंबा, संविधानावर कपटी मनाने केलेले हल्ले आणि लोकशाही कमकुवत होण्याचे परिणाम आपण रोज भोगत आहोत. या विषाणूचा कोणताही सौम्य प्रकार नाही. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी शशी थरूर यांनी या आशयाचं ट्विट केलं आहे. जे सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.

मोदींनी काय आवाहन केलं आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मी देशभरातील सर्व खासदारांचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वागत करतो. आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये भारतासाठी या अर्थसंकल्पात खूप संधी उपलब्ध आहेत. भारताची आर्थिक प्रगती, कोरोना लसीकरण, लस संशोधन या गोष्टीत जगभरात विश्वास निर्माण करत आहे’, असं मोदी म्हणाले.

या अधिवेशनातही खासदारांच्या चर्चा. खासदारांच्या चर्चेचे मुद्दे. मुक्तपणे केली जाणारी चर्चा ही भारतासाठी जागतिक पटलावर प्रभाव निर्माण करणारी संधीच ठरू शकते. सर्व खासदार, सर्व राजकीय पक्ष खुल्या मनाने चांगली चर्चा करून देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी, त्याला गती देण्यासाठी मदत करतील, अशी आशा मी व्यक्त करतो,’ असं आवाहन करत पंतप्रधानांनी विरोधकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं.

काही दिवसांपूर्वीही झाली होती थरूर यांच्या ट्विटची चर्चा

काँग्रेस खासदार शशी थरूर हे त्यांच्या ट्विट आणि वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं एक पत्र ट्विट केलं आहे. त्याची चर्चा ट्विटरवर आणि सोशल मीडियावर चांगलीच होते आहे. नेताजींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना लिहिलेलं हे पत्र आहे. या पत्रात राजकीय नेते एकमेकांचा विचार कसा करायचे ते स्पष्ट होतं आहे. हाच धागा धरून थरूर म्हणाले की ‘आपले राजकीय नेते वाचायचे, लिहायचे, विचार करायचे आणि एकमेकांची काळजीही करायचे. तेव्हापासून आजपर्यंत आपण किती खालच्या पातळीवर आलो आहे?’ असा प्रश्न विचारत त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आता त्यांनी ओ मित्रो या संबोधनाची तुलना ओमिक्रॉन व्हायरससोबत केली आहे.

    follow whatsapp