Krishna Janmashtami: कृष्ण जयंतीनिमित्त पंढरपूर मंदिर सजलं, विठ्ठलाचं गोजिरं रुप

मुंबई तक

• 05:53 AM • 30 Aug 2021

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक रंगबिरंगी फुलांची व फळांची आरास. या रंगीबेरंगी सजावटीमुळे विठ्ठल मंदिर सप्त रंगाने अक्षरश: न्हाऊन निघाले आहे. देवाचा गाभारा, चौखांभी मंडप, सोळखांभी मंडप, आकर्षक अशा फुलांनी सजलं आहे. ही सजावट पुण्याचे भक्त पांडुरंग रत्नाकर मोरे व नानासाहेब बबन मोरेंच्या वतीने करण्यात आली आहे. सजावटीसाठी अँथेलियम, ऑर्केड, शेवंती, कामिनी, झेंडू […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक रंगबिरंगी फुलांची व फळांची आरास.

या रंगीबेरंगी सजावटीमुळे विठ्ठल मंदिर सप्त रंगाने अक्षरश: न्हाऊन निघाले आहे.

देवाचा गाभारा, चौखांभी मंडप, सोळखांभी मंडप, आकर्षक अशा फुलांनी सजलं आहे.

ही सजावट पुण्याचे भक्त पांडुरंग रत्नाकर मोरे व नानासाहेब बबन मोरेंच्या वतीने करण्यात आली आहे.

सजावटीसाठी अँथेलियम, ऑर्केड, शेवंती, कामिनी, झेंडू आणि गुलाब अशी अनेक नानाविध फुलं वापरण्यात आली आहेत.

फुलांसह अननस, कलिंगड, सफरचंद, सिताफळ, मोसंबी, ड्रॅगन फ्रूट व संत्री ही फळं व पानं वापरून आरास करण्यात आली आहे.

या सजावटीसाठी 2000 किलो फुले व 500 किलो फळे वापरण्यात आली असून मोर पिसांचा ही अतिशय सुंदर वापर करण्यात आला आहे.

    follow whatsapp