चौथ्यांदा मुलगीच झाली, जिथं प्रसूती झाली त्याच रुग्णालयात आईने स्वत:... धक्कादायक घटना

Palghar Crime News: रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मुलीचा संशयास्पद मृत्यू दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. तपासात प्रकरण संशयास्पद वाटल्यानं डहाणू पोलिस ठाण्याने महिलेला ताब्यात घेतलं.

Mumbai Tak

मुंबई तक

30 Apr 2025 (अपडेटेड: 30 Apr 2025, 10:45 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजूनही लेकीचा जन्म नकोच?

point

पालघरमध्ये आईनंच घेतला बाळाचा बळी?

point

पोलिसांकडून आईला अटक, तपास सुरू

Palghar News : पालघर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 30 वर्षीय महिलेनं स्वतःच्या नवजात बाळाची हत्या केली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला संबंधित कलमांखाली महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवून तिला अटक केली. या प्रकरणात कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे वाचलं का?

चौथ्यांदा मुलगीच झाल्यामुळे... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला पूनम शाह ही पश्चिम बंगालची रहिवासी आहे. प्रसूतीसाठी तिच्या माहेरी लोणीपारा (पालघर) मध्ये ती आली होती. ही महिला आधीच तीन मुलींची आई आहे. चौथ्यांदा मुलगीच जन्माला आल्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. याच राग आणि नैराश्यातून तिने शनिवारी रात्री सरकारी रुग्णालयात तिच्या नवजात मुलीची गळा दाबून हत्या केली.

हे ही वाचा >>Pahalgam Attack: 'त्या' बैठकीत PM मोदींसह अजित डोवालही, म्हणजे प्लॅन ठरलाय.. काय आहे Inside स्टोरी?

आईवर संशय आल्यानं चौकशी केली... 

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मुलीचा संशयास्पद मृत्यू दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. तपासात प्रकरण संशयास्पद वाटल्यानं डहाणू पोलिस ठाण्याने महिलेला ताब्यात घेतलं. चौकशीनंतर  प्रकरणाचा उलगडा झाला. आरोपी पूनम शाह हिच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 103 (1) (खून) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >>दिव्यांग तरूणाला निघृणपणे संपवलं, मृतदेह जिप्सी कारमध्ये टाकून पसार झाले, मंचरमध्ये खळबळजनक घटना

निरीक्षक दादासाहेब गुटुखडे म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. महिलेची मानसिक स्थिती काय होती आणि त्यात आणखी कोणी सहभागी आहे का याची सविस्तर चौकशी केली जात आहे.

 

    follow whatsapp