भाजपच्या माजी नगरसेवकाने चौथे लग्न केले; नाराज मुलाने सावत्र आईला भर रस्त्यातच भोसकले

मुंबई तक

07 Feb 2026 (अपडेटेड: 07 Feb 2026, 04:31 PM)

Crime News : भाजपच्या एका माजी नगरसेवकाच्या तिसऱ्या पत्नीची तिच्याच सावत्र मुलाने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्यप्रदेशातील मंदसौरमधील भाजपचे माजी नगरसेवक शाहिद मेव यांची तिसरी पत्नी असलेल्या रुबिना हिची तिचा सावत्र मुलगा साहिल याने भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी साहिल आणि त्याचा मित्र सोहेल या दोघांना अटक केली आहे. वडिलांनी आपल्या विरोधाला न जुमानता तिसरे लग्न केल्याने साहिल अत्यंत संतापलेला होता आणि याच रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भाजपच्या माजी नगरसेवकाने चौथे लग्न केले

point

नाराज मुलाने सावत्र आईला भर रस्त्यातच भोसकले

Crime News : भाजपच्या एका माजी नगरसेवकाच्या तिसऱ्या पत्नीची तिच्याच सावत्र मुलाने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्यप्रदेशातील मंदसौरमधील भाजपचे माजी नगरसेवक शाहिद मेव यांची तिसरी पत्नी असलेल्या रुबिना हिची तिचा सावत्र मुलगा साहिल याने भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी साहिल आणि त्याचा मित्र सोहेल या दोघांना अटक केली आहे. वडिलांनी आपल्या विरोधाला न जुमानता तिसरे लग्न केल्याने साहिल अत्यंत संतापलेला होता आणि याच रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : जवानाच्या डोक्यावर विळ्याने सपासप वार, 'त्या' कारणामुळे बायको उठली जीवावर!

रिक्षा अडवून भर रस्त्यात भोसकले

गुरुवारी (5 फेब्रुवारी) संध्याकाळी रुबिना आपल्या माहेरहून रिक्षाने घरी परतत असताना साहिल आणि सोहेल यांनी तिची वाट अडवली. साहिलने रुबिनाला रिक्षातून ओढून बाहेर काढले आणि 'तुला समजत नाहीये का, तू आमच्या कुटुंबात ढवळाढवळ करत आहेस' असं म्हणत तिच् चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रुबिनाला तसेच सोडून आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. या प्राणघातक हल्ल्यात रुबिना यांचा जागीच मृत्यू झाला. 

वडिलांच्या लग्नाला विरोध

या हत्येमागे कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी आहे. भाजपचे माजी नगरसेवक शाहिद मेव यांनी काही महिन्यांपूर्वीच रुबिनाशी विवाह केला होता. हे शाहिद यांचे तिसरे आणि रुबिना यांचे चौथे लग्न होते. सुरुवातीला शाहिद यांनी हे लग्न लपवून ठेवले होते, मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी रुबिनासोबतचे फोटो सार्वजनिक केले आणि ते उघडपणे सोबत राहू लागले. शाहिद यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा असलेल्या साहिलने या लग्नाला तीव्र विरोध केला होता. वारंवार समजावूनही वडिलांनी रुबिनाला घरात स्थान दिल्याने घरातील इतर सदस्यही नाराज होते.

हे ही वाचा : लग्नाचा वाढदिवस असल्याने संपूर्ण कुटुंब केक घेऊन रात्रभर वाट पाहत बसलं, पहाटे मुलाचा मृतदेहच घराकडे आला!

आरोपींना अटक

पोलीस अधीक्षक विनोद कुमार मीणा यांनी सांगितले की, आरोपी साहिल आणि सोहेल या दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपीने चौकशीत सांगितले की, वडिलांच्या तिसऱ्या लग्नामुळे संपूर्ण कुटुंबात असंतोष होता आणि वारंवार सांगूनही रुबिना त्यांच्या आयुष्यातून बाजूला होत नसल्याने त्यांनी तिची हत्या करण्याचा कट रचला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.