बलात्काराच्या केसमध्ये जेलमध्ये पाठवलं, त्या तरुणासोबतच लग्न करण्याचा तरुणीचा हट्ट, काय घडलं?

मुंबई तक

27 Jul 2026 (अपडेटेड: 27 Jul 2026, 03:25 PM)

gorakhpur crime news : गोरखपूरमध्ये एका तरुणीने ज्या युवकाविरोधात लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार केली होती, त्यालाच दुसऱ्या दिवशी लग्न करण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावण्याची मागणी केली. आरोपी जेलमध्ये असल्याचे समजताच तरुणीने पोलीस ठाण्याबाहेर फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

gorakhpur crime news

gorakhpur crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बलात्काराच्या केसमध्ये जेलमध्ये पाठवलं

point

त्या तरुणासोबतच लग्न करण्याचा तरुणीचा हट्ट, काय घडलं?

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने एका युवकाविरोधात लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार दाखल करून त्याला जेलमध्ये पाठवले होते. मात्र त्याच तरुणीने दुसऱ्याच दिवशी त्या युवकासोबत लग्न करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यात हजेरी लावली. पोलिसांनी आरोपी सध्या जिल्हा कारागृहात असल्याचे सांगितल्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्याबाहेर फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.

हे वाचलं का?

हेही वाचा : MPSC पेपरफुटीचा काळा कारभार, 'ती' अ‍ॅकॅडमी अन् किती लाखांत सौदा? रोहित पवारांचा नवा बॉम्ब

युवकाने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरच्या चौरी चौरा पोलीस ठाण्यात संबंधित तरुणीने एका युवकाविरोधात तक्रार नोंदवली होती. युवकाने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला होता. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी युवकाला अटक केली आणि त्याला न्यायालयीन प्रक्रियेनंतर जेलमध्ये पाठवण्यात आले.

हेही वाचा : आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर AK 47 ने गोळीबार, राहुल गांधींकडून व्हिडिओ शेअर

त्यानंतर शनिवारी तीच तरुणी पुन्हा चौरी चौरा पोलीस ठाण्यात पोहोचली. यावेळी तिची मागणी पूर्णपणे वेगळी होती. तिने पोलिसांना त्या युवकाला ठाण्यात बोलवण्याची विनंती केली आणि त्याच्यासोबत लग्न करायचे असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिला समजावले की ज्या युवकाबद्दल ती बोलत आहे, तो सध्या जिल्हा कारागृहात बंद आहे आणि त्याला पोलीस ठाण्यात बोलावणे शक्य नाही. भेट घ्यायची असल्यास जेलच्या नियमांनुसार प्रक्रिया करावी लागेल, असेही तिला सांगण्यात आले.

पर्समधून फिनाईलची बाटली काढली अन्.. 

मात्र तरुणी आपल्या मागणीवर ठाम राहिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, काही वेळाने ती पोलीस ठाण्याबाहेर गेली आणि आपल्या पर्समधून फिनाईलची बाटली काढून ते प्राशन केले. हे पाहताच पोलिसांनी तत्काळ धाव घेत तिला चौरी चौरा सीएचसी रुग्णालयात दाखल केले. तेथून तिची प्रकृती लक्षात घेऊन तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. चौरी चौरा विभागाचे सीओ कुंदन कुमार सिंह यांनी सांगितले की, संबंधित तरुणीने आरोपीला ठाण्यात बोलवण्याचा आग्रह धरला होता. तिला आरोपी जेलमध्ये असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर तिची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली आणि तिने घरात वापरले जाणारे फिनाईल प्राशन केल्याचे समोर आले. तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली असून रुग्णालयात तिची प्रकृती सध्या सामान्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.