kalyan crime : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात पोलीस कर्मचाऱ्यावर मद्यधुंद तरुणाने काठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागरिकांच्या तक्रारीवर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. या संपूर्ण घटनेचा परिसरातील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : कॉकरोच जनता पार्टी आता पंजाबमधील 'त्या' मुद्द्यावरही बोलणार, अभिजीत दिपकेंनी सगळं सांगितलं
तरुणाचा मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा
मिळालेल्या माहितीनुसार, गौरीपाडा परिसरात राहुल तायडे हा तरुण मद्यधुंद अवस्थेत नागरिकांच्या घराबाहेर उभा राहून आरडाओरडा करत होता. त्याच्या या वर्तनामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. अखेर नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून याबाबत तक्रार नोंदवली. तक्रार मिळाल्यानंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा : 'उत्तर प्रदेशची निवडणूक महत्त्वाची, योगींसाठी कठीण काळ', नवनीत मनधानी काय म्हणाले?
पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्यावर हल्ला
घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांनी राहुल तायडे याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी राहुल तायडे याने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर अचानक त्याने हातातील काठीने पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना मारहाण करण्यात आली. संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी राहुल तायडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारीवर गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला झाल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT












